शिक्षण विभागाने शहरातील सम्राट अशोक प्राथमिक शाळेची गेल्या वर्षांपूर्वी मान्यता रद्द केली. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचे पगार बंद झाले. त्यांचे इतर शाळेत समायोजन केले नाही. इतर शाळेत हे समायोजन करावे, या प्रमुख मागणीसाठी सहशिक्षिका बाली सखाराम िशदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली.
संस्थाचालक मरीबा सोनकांबळे यांनी सम्राट अशोक ही शाळा एका व्यक्तीला विक्री केली. परंतु पुढे वाद झाल्याने शिक्षण विभागाने गेल्या वर्षी २४ जुलस शाळेची मान्यता रद्द केली. परंतु मान्यता रद्द केल्याबाबत लेखी पत्र संस्थेला दिले नाही. तसेच संस्थाचालकालाही शाळा पुढे चालू ठेवण्यात रस नाही. त्यामुळे वर्षांपासून पगार बंद आहे. समायोजनाबाबत शिक्षण विभागाकडे अर्ज विनंत्या केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला. परंतु कुठेच दाद मिळाली नाही. त्यामुळे कंटाळलेल्या शिंदे दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला, असे श्रीमती िशदे यांनी या बाबत बोलताना सांगितले.
िशदे दाम्पत्य दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी शोभा राऊत यांची भेट घेत गेल्या वर्षांपासून पगार बंद आहे, समायोजनही केले जात नाही, अशी कैफियत मांडली. राऊत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. या उत्तराने समाधान न झाल्याने दालनाबाहेर येत या दाम्पत्याने समोरील व्हरांडय़ात सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल एक-दुसऱ्याच्या अंगावर टाकून घेतले. स्वतला पेटवून घेण्यासाठी आगपेटीतून काडी काढली. तेवढय़ात काही कर्मचारी व पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी तानाजी दराडे हेही जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2013 रोजी प्रकाशित
महिला शिक्षिकेचा पतीसह पेटवून घेण्याचा प्रयत्न
शिक्षण विभागाने शहरातील सम्राट अशोक प्राथमिक शाळेची गेल्या वर्षांपूर्वी मान्यता रद्द केली. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचे पगार बंद झाले. त्यांचे इतर शाळेत समायोजन केले नाही.

First published on: 25-07-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try to take burned by teacher with husbands