स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलात इंटिग्रेटेड एम.बी.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, असे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी सांगितले.
बारावी कला, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी. व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. खुल्या वर्गासाठी किमान ५० टक्के, तर राखीव वर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. विद्यापीठात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षाच्या गुणांवर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश परीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार असून, इंग्रजी माध्यमातून या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाणार आहे. फक्त ३० विद्यार्थ्यांनाच यात प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमात पहिली तीन वर्षे पदवी व अंतिम दोन वर्षे पदव्युत्तर एम.बी.ए. असणार आहे. विद्यार्थ्यांने तीन वर्षांनंतर हा अभ्यासक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्यास, त्या विद्यार्थ्यांस बी.बी.ए. ही पदवी प्रदान करण्यात येईल. माहितीसाठी अभ्यासक्रम समन्वयिका प्रा. डॉ. व्ही. एन. लातूरकर व सहायक प्रा. गजानन मुधोळकर यांच्याशी ९९७०६०८७७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र बिरादार यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
‘स्वारातीम’ मध्ये एमबीएची बारावी उत्तीर्णासाठी संधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलात इंटिग्रेटेड एम.बी.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, असे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी सांगितले.
First published on: 30-05-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twelve pass student chance of mba in swaratim