दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाले. जिल्हय़ातील घाटसावळीजवळ बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. बीड-परळी राज्य रस्त्यावर सिद्धेश्वर रामेश्वर नाईकवाडे (वय २३, खेर्डा, तालुका गेवराई) हा तरुण दुचाकीवरून (एमएच २३ ५२२) घाटसावळीवरून बीडकडे येत होता. गोिवद गुलाब सोनवणे (वय २४, अंबाजोगाई) दुचाकीवरून (एमएच ४४ ९४९०) बीडहून अंबाजोगाईकडे जात असताना दोन दुचाकींची घाटसावळीजवळ समोरासमोर धडक झाली. यात हे दोघेही ठार झाले, तर अनिल दोहाडकर हा जखमी झाला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2013 रोजी प्रकाशित
दोन दुचाकींची धडक; दोघांचा जागीच मृत्यू
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाले. जिल्हय़ातील घाटसावळीजवळ बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.
First published on: 25-10-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in road accident