एकामागे एक असलेल्या दोनच सीट, विजेवर चालणारी आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारी फोक्सव्ॉगनची‘निल्स’ मोटार पुण्यात भरवण्यात येणाऱ्या ‘इंडो-जर्मन अर्बन मेळाव्या’ मध्ये पाहता येणार आहे. हा मेळावा ११ ते २० जानेवारी या कालावधीत डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे होणार आहे.
फोक्सव्ॉगन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अॅलेक्झांडर स्कीब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निल्स मोटार विजेवर चालते. पुढच्या चाकापासून मागच्या चाकापर्यंत या गाडीची लांबी फक्त ३.०४ मीटर्स आहे आणि १.३९ मीटर्स रुंद आहे. या गाडीमध्ये अॅल्युमिनियम, स्पेस फ्रेम, विंग डोअर्स आणि प्री-स्टॅन्डींग व्हिल्स आहेत, त्यामुळे ती स्पोर्स्ट कार इतकी वेगाने पळू शकते व कोणत्याही प्रकारचा आवाजही येत नाही. वजनाचे योग्य वितरण, वेगळी रचना, ऑटोमॅटिक ब्रेकिंग आणि १३० किलोमीटर प्रती तास वेग ही या गाडीची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. शहरात नियमित गाडी चालवणाऱ्यांसाठी हे एक उत्तम वाहन ठरू शकते, असा दावा स्कीब यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
फक्त एकामागे एक सीट असलेली ‘निल्स’ पुण्यात प्रदर्शित होणार
एकामागे एक असलेल्या दोनच सीट, विजेवर चालणारी आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारी फोक्सव्ॉगनची‘निल्स’ मोटार पुण्यात भरवण्यात येणाऱ्या ‘इंडो-जर्मन अर्बन मेळाव्या’ मध्ये पाहता येणार आहे. हा मेळावा ११ ते २० जानेवारी या कालावधीत डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे होणार आहे.
First published on: 05-01-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two seater nils car in pune to display