मध्य रेल्वेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांसाठी २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूरमार्गे कोल्हापूर-उस्मानाबाद व कुर्डुवाडी-मिरज या ज्यादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर-उस्मानाबाद ही विशेष गाडी २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूरहून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघणार असून रात्री १० वाजून २० मिनिटांनी पंढरपूरला तर, रात्री १ वाजून ५ मिनिटांनी उस्मानाबादला पोहोचेल. तसेच उस्मानाबाद-कोल्हपूर ही विशेष गाडी २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान उस्मानाबादवरून पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूरला तर, सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
मिरज – कुर्डुवाडी ही विशेष रेल्वे २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत मिरजहून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी पंढरपूरला तर, सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी कुर्डुवाडीला पोहोचणार आहे. कुर्डुवाडी-मिरज ही गाडी कुर्डुवाडीवरून दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी पंढरपूला पोहोचेल.
या विशेष गाडीमध्ये आठ द्वितीय श्रेणी आरक्षित शयनयान, एक थ्री टायर एसी व टू टायर एसी तसेच, तीन द्वितीय श्रेणी व दोन एसएलआरसह एकूण १५ डब्यांची सोय करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
कार्तिकी एकादशीसाठी रेल्वेच्या पंढरपूरमार्गे दोन विशेष गाडय़ा
मध्य रेल्वेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांसाठी २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूरमार्गे कोल्हापूर-उस्मानाबाद व कुर्डुवाडी-मिरज या ज्यादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर-उस्मानाबाद ही विशेष गाडी २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूरहून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघणार असून रात्री १० वाजून २० मिनिटांनी पंढरपूरला तर,
First published on: 24-11-2012 at 03:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two speical trains for kartiki ekadashi in way of pandharpur