‘युनिव्हर्सल मराठी’ या संस्थेतर्फे ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.  मानवी जीवनाच्या छटा, छोटेछोटे प्रसंग, भावभावना, एखाद्या विषयावरील भाष्य किंवा संकल्पना जिवंतपणे मांडणाऱ्या लघुपटांचा हा महोत्सव रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये भरविण्यात येणार आहे. यासाठी विनामूल्य प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर आहे.
सामाजिक जनजागृती, मोबाइल शूट फिल्म, दृश्य परिणाम म्हणजेच व्हीएफएक्स-अ‍ॅनिमेशन, आंतरराष्ट्रीय लघुपट, जाहिरापट अशा पाच गटांमध्ये प्रवेशिका मागविण्यात येत असून तज्ज्ञ परीक्षक यातून विजेत्यांची निवड करतील. यानिमित्त नव्या निर्मात्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘धग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील तसेच ‘देवी’ या आगामी मराठी चित्रपटातील कलावंत पूर्वा पवार, उदय सबनीस, विलास उजवणे, अंजली उजवळे, बाळ धुरी व दिग्दर्शक दत्ता जमखंडे उपस्थित राहणार आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी युनिव्हर्सल मराठी या फेसबुक पेजला भेट देता येईल. त्याशिवाय ९७६८९३०८५३ अथवा ९८३३०७५७०६ या क्रमांकांवरही संपर्क साधता येईल, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी पत्रकात दिली आहे.