वाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे उमेश लोखंडे तर उपसरपंचपदी भाजपचे रोहन पाटील विजयी झाले आहेत. वाडा तालुक्यात १७ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी शिवसेना-भाजप युतीने १२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. बहुजन विकास आघाडीला तीन, काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तसेच राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही. दरम्यान १७ पैकी १० जागांवर महिला संदस्यांचा विजय झाला असून, सरपंच तसेच उपसरपंच पदासाठी त्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
वाडा ग्रामपंचायत : सरपंचपदी उमेश लोखंडे तर उपसरपंचपदी रोहन पाटील
वाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे उमेश लोखंडे तर उपसरपंचपदी भाजपचे रोहन पाटील विजयी झाले आहेत. वाडा तालुक्यात १७ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी शिवसेना-भाजप युतीने १२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. बहुजन विकास आघाडीला तीन, काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तसेच राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही. दरम्यान १७ पैकी १० जागांवर महिला संदस्यांचा विजय झाला असून, सरपंच तसेच उपसरपंच पदासाठी त्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
First published on: 27-12-2012 at 12:03 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vada village panchayat