‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या संकेतस्थळांच्या स्पर्धेत राज्य विश्वकोश मंडळाच्या संकेतस्थळाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या या स्पर्धेत विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, डॉ. शोभा शिंदे, ‘सी डॅक’चे सहसंचालक महेश कुलकर्णी, चंद्रकांत धुतडमल यांनी संकेतस्थळाचे सादरीकरण सादर केले.
विश्वकोशाचे ६६६.ें१ं३ँ्र५्र२ँ६ं‘२ँ.्रल्ल हे संकेतस्थळ १०५ देशांतील सुमारे दहा लाख जणांनी पाहिले आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून विश्वकोशाची २३ हजार पाने माहितीच्या महाजालात आणण्यात आली आहेत.