मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वेळुक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून नववर्षांची सुरुवात विधायक कार्यक्रमातून व्हावी या उद्देशातून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि अपर्ण ब्लड बँक संगमनेर यांच्या प्रयत्नाने शिरोशी जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमात २९ रक्तपिशव्या संकलित झाल्या. नववर्षांच्या सुरुवातीला अनेक खर्चिक कार्यक्रम केवळ आनंद, मौजमजेसाठी आयोजित केले जातात. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नववर्षांच्या सुरुवातीला वर्षभरात आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य होईल असा संकल्प सोडावा, त्यातून विधायक कार्य उभे राहू शकते, हे दाखवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिक्षक महेंद्र सुपेकर यांनी सांगितले. रक्तदानासाठी बुरसुंगे, शेलगाव, वेळुकचे ग्रामस्थ आले होते. या शिबिरात २८ पुरुष व मनीषा सुपेकर या महिलेने रक्तदान केले. यावेळी सरपंच रूपाली झापडे, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे, विलास देशमुख उपस्थित होते. रक्तदात्यांना पर्यावरणाचा संदेश देणारी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
रक्तदानाने नववर्षांचे स्वागत; दुर्गम वेळुक शाळेचा उपक्रम
मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वेळुक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून नववर्षांची सुरुवात विधायक कार्यक्रमातून व्हावी या उद्देशातून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि अपर्ण ब्लड बँक संगमनेर यांच्या प्रयत्नाने शिरोशी
First published on: 10-01-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to new year by arrengeing blood donation camp