वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, रोजगार वाढीसाठी विविध पर्याय खुले करून द्यावे, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समिती व कामगार विकास मंचच्यावतीने शनिवारी सकाळी १० वाजता कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राणेनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात हा मेळावा आहे.
कामगार प्रतिनिधी म्हणून काम करताना वेतन वाढत असले तरी महागाई नियंत्रणात आलेली नाही. यासाठी सरकारी धोरणात बदल तसेच कामगार हिताचे कायदे होणे गरजेचे आहे.
कामगारांनी आपल्या प्रश्नावर एकजुटीने लढा दिला, तर त्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागणार नाही. कामगार एकजुटीसाठी कामगार संयुक्त कृती समिती कार्यरत असून मेळाव्यात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, कामगार कायद्याची अंमलबजावणी, सर्वाना समान निवृत्तिवेतनाची हमी आणि निवृत्तिवेतनाची रक्कम वाढवावी, बोनस व भविष्य निर्वाह निधीवरील मर्यादा उठवावी, ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढवावी, कायद्यात बदल करावे, किमान वेतनात वाढ, सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण बंद करावे, संघटित व असंघटित कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी आणि कंत्राटीकरण थांबवावे आदी मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त कृती समिती व कामगार विकास मंचने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
कामगार संयुक्त कृती समितीचा आज मेळावा
वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, रोजगार वाढीसाठी विविध पर्याय खुले करून द्यावे, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समिती व कामगार विकास मंचच्यावतीने शनिवारी सकाळी १० वाजता कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
First published on: 12-01-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker composite action council meeting today