मी दादर येथील वैशाली ज्वेलर्समध्ये भागीदार आहे. तुम्हाला शुद्ध सोने कमी भावात देते असे सांगून गिरगावमधील माधवी किशोर टेंबे (२८) या तरुणीने दोघा डोंबिवलीकरांना ९ लाख ९० हजार रुपयांना फसविले आहे. माधवी गिरगावमधील क्रांतीनगरमध्ये राहते. तिने गोग्रासवाडीत राहणाऱ्या जीवन माळी (वय ४०) यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये शुद्ध सोने देण्याची बतावणी करून उकळले. राजाजी पथावरील ज्ञानेश्वर कोळमकर (वय ४८) यांच्याकडूनही माधवीने शुद्ध सोन्याची नाणी देते सांगून ६ लाख रुपये वसूल केले आहेत. या दोघांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रामनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2013 रोजी प्रकाशित
गिरगावच्या तरुणीकडून दोघा डोंबिवलीकरांची फसवणूक
मी दादर येथील वैशाली ज्वेलर्समध्ये भागीदार आहे. तुम्हाला शुद्ध सोने कमी भावात देते असे सांगून गिरगावमधील माधवी किशोर टेंबे (२८) या तरुणीने दोघा डोंबिवलीकरांना ९ लाख ९० हजार रुपयांना फसविले आहे.
First published on: 29-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl of girgaum cheated two man of dombivali