चौदा वर्षांच्या एका शालेय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सूरज जंगलू कदम या २२ वर्षांच्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
सूरज कदम (रा. २८०, कुमठा नाका, सोलापूर) हा मजुरी करतो. त्याने आपल्या घराजवळच्या शिवगंगानगर भागातील एका शालेय मुलीशी ओळख काढून तिच्याशी जवळीक वाढविली. त्याने तिच्यासमोर प्रेमाचे नाटक करून लग्न करण्याचे आमिष दाखविले. सदर मुलगीही आमिषाला बळी पडली. सूरज याने सदर मुलीला फूस लावून पळवून नेले व हैदराबाद रस्त्यावर मुळेगावजवळ गणेशनगर येथे आपल्या आप्तेष्टाच्या घरात ठेवले. त्याठिकाणी त्याने सदर मुलीवर बलात्कार केला. याबाबत मुलीच्या वडिलांनी, आपल्या मुलीला सूरज कदम याने पळवून नेण्यात आल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी तपास करून सूरज यास अटक केली. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे दिसून आले. सूरज यास पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात शालेय मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक
चौदा वर्षांच्या एका शालेय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सूरज जंगलू कदम या २२ वर्षांच्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 01-01-2013 at 08:38 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth arrested in rape case in solapur