झी मराठी वाहिनीने रसिकप्रेक्षकांना मालिका तसेच कार्यक्रमांशी जोडून घेता यावे म्हणून हे लक्षात घेऊन प्रेक्षकांना सहभागी करून घेणारा ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड’ पुरस्कार सोहळा सुरू केला. विविध मालिकांमधील ज्या व्यक्तिरेखा तसेच कार्यक्रमांना प्रेक्षकांच्या मतांचे दान सर्वाधिक मिळते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे.
‘होणार सून मी या घरची’ ही मालिका यंदा सवरेत्कृष्ट ठरली असून त्याखालोखाल ‘तू तिथं मी’, ‘राधा ही बावरी’ या मालिकांमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारे कलावंत पारितोषिक विजेते ठरले आहेत. दादा होळकर अर्थात मिलिंद शिंदे यांना सवरेत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.