शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या आघाडीच्या संस्थांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
शास्त्रीय नृत्यकौशल्य आत्मसात केल्यास करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र, त्याकरता शास्त्रीय नृत्याची मनापासून आवड आणि अत्यंत परिश्रम करण्याची तयारी महत्त्वाची ठरते. नृत्य विषयक प्रशिक्षण देणाऱ्या काही आघाडीच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत..
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक डान्स : ही संस्था केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी देशातील सर्वात आघाडीची संस्था मानली जाते. कथ्थक नृत्याच्या समृद्ध परंपरेची जोपासना आणि प्रशिक्षण देणारी ही संस्था १९६४ साली सुरू झाली. या कथ्थक केंद्रात प्रतिभावंत कथ्थक गुरूंमार्फत नव्या कलावंतांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात कला, कौशल्य आणि कल यांचा समन्वय साधला जातो. या केंद्रात कथ्थक नृत्याच्या दोन प्रवाहांवर भर दिला जातो.
संस्थेचे अभ्यासक्रम : प्राथमिक (एलिमेंटरी) अभ्यासक्रम- या अभ्यासक्रमांतर्गत पाच वष्रे कालावधीच्या फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा आणि तीन वष्रे कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
* प्रगत अभ्यासक्रम- यात तीन वष्रे कालावधीचा पदविका (ऑनर्स) अभ्यासक्रम आणि दोन वष्रे कालावधीचा पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.
* तीन वष्रे कालावधीचा डिप्लोमा पास कोर्स- या अभ्यासक्रमात कथ्थक नृत्याच्या व्यापक तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १५ ते २० वर्षांदरम्यान असावे. अर्हता- किमान नववी उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजीमध्ये या विद्यार्थ्यांस लिहिता, वाचता आणि बोलता यायला हवे. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे. प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
प्रगत अभ्यासक्रमात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दररोज कथ्थक नृत्याचा सराव, योगाभ्यास, हिंदुस्थानी कंठसंगीत आणि तबला/ पखवाजचे प्रशिक्षण, तज्ज्ञांच्या कार्यशाळा, सादरीकरणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी, सर्जनशील सादरीकरण या बाबींचा समावेश करण्यात येतो.
तीन वष्रे कालावधीच्या डिप्लोमा ऑनर्स या अभ्यासक्रमात कथ्थक सादरीकरण कौशल्याचा पाया मजबूत करणारे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणास योग, हदुस्थानी कंठसंगीत, तबला/ पखवाज आणि अभिनय कला यांच्या प्रशिक्षणाचीही जोड दिली जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी १८ ते ३० वष्रे.
अर्हता- कथ्थक केंद्राच्या पदविका परीक्षेमध्ये ६० टक्के गुण किंवा इतर गुरूंकडे प्रशिक्षण घेतले असल्यास किमान आठ वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराला िहदी अथवा इंग्रजीमध्ये लिहिता, वाचता, बोलता यायला हवे. त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे.
दोन वष्रे कालावधीच्या पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमात परिपूर्ण कथ्थक नृत्य सादरकर्ता बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वयोमर्यादा- १ जून रोजी २० ते २६ वष्रे. अर्हता- बारावी, कथ्थक केंद्राच्या डिप्लोमा ऑनर्स परीक्षेत ६५ टक्के गुण आणि इतर सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण. हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिता, बोलता, वाचता यायला हवे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असावे. नृत्यातले सादरीकरण आणि संगीतातील कलचाचणी घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
फी- फाऊंडेशन- दरमहा २५० रुपये. डिप्लोमा पास- दरमहा- ३०० रुपये, डिप्लोमा ऑनर्स- दरमहा ३५० रुपये, पोस्ट डिप्लोमा दरमहा- ४५० रुपये.
संपर्क- कथ्थक केंद्र, २, सॅन मार्टनि मार्ग, चाणक्यपुरी, न्यू दिल्ली- ११००२१. संकेतस्थळ- kathakkendra.org
ईमेल- connect@kathakkendra.org

नालंदा नृत्य कला महाविद्यालय : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या संस्थेत बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स इन डान्स (कालावधी- पाच वष्रे.), मास्टर ऑफ अभ्यासक्रम ऑफ परफॉìमग आर्ट्स इन डान्स हा (कालावधी- दोन वष्रे.) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय या विषयात पीएच.डी सुद्धा करता येते. या अभ्यासक्रमांतर्गत मोहिनीअट्टम, भरतनाटय़म आणि कथ्थक नृत्यशैलीचा अभ्यास करता येतो.
संपर्क- नालंदा डान्स रिसर्च सेंटर, प्लॉट अ- ७/१, एन. एस. रोड नंबर- १०, जेव्हीपीडी स्कीम, विलेपाल्रे (पश्चिम),
मुंबई- ४०००४९.
संकेतस्थळ- http://www.nalandadanceeducation.com
ईमेल- nalandarzww@gmail.com

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

भारतीय विद्या भवन, बंगळुरू : या संस्थेमार्फत भरतनाटय़म/ कथ्थक या नृत्यप्रकारांतील कनिष्ठ पदविका आणि प्रगत पदविका हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कंठ हिंदुस्थानी संगीत आणि कंठ कर्नाटकी संगीत यांमध्ये कनिष्ठ पदविका आणि प्रगत पदविका हे अभ्यासक्रम करता येतात. तबला, वीणा, बासरी, व्हायोलिन, सतार, मृदंगम आणि की बोर्ड आणि सुगम संगीत यामध्ये कनिष्ठ पदविका आणि प्रगत पदविका हे अभ्यासक्रम करता येतात. संपर्क- ४३, रेस कोर्स रोड, बंगळुरू- ५६०००१.
संकेतस्थळ- http://www.bhavankarnataka.com

ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ : डिप्लोमा इन भरतनाटय़म/ कथ्थक: कालावधी- तीन वष्रे. सर्टिफिकेट इन भरतनाटय़म/ कथ्थक: कालावधी- दोन वष्रे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या न्यू मरिन लाइन्स येथील कॅम्पसमध्ये चालवला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ डिसेंबर महिन्यात होतो.
संकेतस्थळ- http://www.narthaki.com

भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉìमग आर्ट्स : या संस्थने बॅचलर ऑफ आर्ट्स इन डान्स (कथ्थक/ भरतनाटय़म) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- तीन वष्रे.
अर्हता- भरतनाटय़म- नृत्य आणि अभिनय कलेचे दर्शन घडवणारे १० मिनिटांचे एकल नृत्यसादरीकरण करावे लागेल. कथ्थक- उमेदवारांना दोन तालांचे ज्ञान हवे. किमान १० मिनिटांपर्यंत गतभाव, ठुमरी, वंदना, तोडा, तुकडा याचे सादरीकरण करता यायला हवे.
संपर्क- भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉìमग आर्ट्स, तळ मजला, पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, भारती विद्यापीठ, युनिव्हर्सटिी एज्युकेशन कॉम्प्लेक्स, पुणे रोड, पुणे. संकेतस्थळ- spa.bharatividyapeeth.edu

शामक डान्स एज्युकेशन : सुप्रसिद्ध नृत्यरचनाकार शामक डावर यांच्या शामक डान्स एज्युकेशन या संस्थेने शाळकरी मुलांसाठी शामक डान्स एज्युकेशन प्रोग्रॅम हा अभ्यासक्रम
सुरू केला आहे. संपर्क- http://www.shiamak.com
ईमेल- sde@ shiamak.com

शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी शिष्यवृत्ती
नॅशनल हॅण्डिकॅप्ड फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेमार्फत शारीरिकदृष्टय़ा अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या शारीरिक अपंग विद्यार्थ्यांसाठी आहे. यातील ३० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहेत. या शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना १० महिन्यांसाठी दरमहा २,५०० रुपये आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या उमेदवारास दरमहा ३,००० रुपये दिले जातात. अभ्यासासाठी निगडित पुस्तके व इतर साहित्य (पदवी अभ्यासक्रम- वार्षकि ६ हजार रुपये), (पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- वार्षकि
१० हजार रुपये) यासाठी अर्थसाहाय्य केले जाते.
संकेतस्थळ- http://www.nhfdc.nic.in
ईमेल- nhfdctf@gmail.com