24 April 2019

News Flash

कोणती कार घेऊ?

टाटा नेक्सन तुम्हाला ८ लाखात मिळू शकेल. पेट्रोलचे मायलेज कमी आहे.

 

मला ५ आसनी नवीन कार घ्यायची आहे. बजेट ७ लाख आहे. टाटा नेक्सन ही कशी गाडी आहे. उत्तम गाडी सुचवा.

अक्षय वाघमारे

होय, टाटा नेक्सन तुम्हाला ८ लाखात मिळू शकेल. पेट्रोलचे मायलेज कमी आहे. तुम्ही पेट्रोलमधील बलेनो घ्यावी. ती तुम्हाला ७ लाखात मिळेल.

मला नवीन कार घ्यायची आहे. आठवडय़ाचा प्रवास जवळपास ३०० किमी आहे. मी पेट्रोल कार घ्यावी की डिझेल? नवीन गाडी घेणे उत्तम की जुनी वापरलेली चांगली राहील. फोक्सवॅगन अ‍ॅमिओ हायलाइन किंवा नवीन स्विफ्ट डिझायर यापैकी कोणता पर्याय योग्य राहील याबाबत कृपया मार्गदर्शन करा.

वैभव

मी तुम्हाला फोक्सवॅगन अ‍ॅमिओ पेट्रोल हा पर्याय सुचवेन. तिचे मायलेज आणि आरामदायीपणा उत्तम आहे. गाडीचे इंजिनही अतिशय शक्तिशाली आहे. ही कार शहरात आणि हायवेवर चालविण्यासाठीही उत्तम आहे.

माझे बजेट ६ लाख रुपये आहे. टिआगो पेट्रोल कशी राहील तसेच गाडीचे मायलेज कसे आहे. कृपया योग्य गाडी सुचवा.

विशाल पाटील, औरंगाबाद

टिआगो पेट्रोलला शहरी भागात जरा कमी मायलेज आहे. हायवेवर १८ देते. तुमचे रनिंग दिवसाला ५० किमीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही डिझेल कार घ्यावी.

माझा नियमित प्रवास हा जवळपास ५० किलोमीटरचा आहे. तो शहरात आणि हायवेवर आहे. मी सीएनजी आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय असलेली कार पाहत होतो. मात्र अशा प्रकारचे मॉडेल मला सापडले नाही. माझे बजेट ६ लाख आहे. कृपया योग्य कार सुचवा.

आनंद कुलकर्णी

जर तुमचे नियमित रनिंग जास्त असेल तर तुम्ही डिझेल अ‍ॅटोमॅटिक कार म्हणजे डिझायर एएमटी ही गाडी घ्यावी. ती ९ लाखात मिळेल अथवा सेलेरियो एएमटी खरेदी करावी. तिचे मायलेज उत्तम आहे.

मला नवीन गाडी घ्यायची आहे. बजेट साडेपाच लाख रुपयांदरम्यान आहे. माझा प्रवास जास्त नाही. मी वॅगनार आर व्हीएक्सआय प्लस, सेलेरियो आणि इग्निस सिग्मा या पेट्रोल गाडय़ांपैकी एक गाडी घ्यायच्या विचारात आहे. कृपया मार्गदर्शन करा.

निखिल चौधरी

तुम्हाला म्यॅनुअल ट्रान्समिशन गाडी घ्यायची असेल तर बेसिक इग्निस घ्यावी. ती एक उत्तम कार आणि दमदार इंजिनसह तुम्हाला अगदी सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील. ती तुम्हाला ५.५० लाखांत येईल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on December 1, 2017 12:39 am

Web Title: car advice car related problem