28 May 2020

News Flash

टेस्ट ड्राइव्ह : हॅचबॅक श्रेणीत सेडानचा अनुभव

हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत निसान मायक्रा किंवा डॅटसन गो यांच्या जवळ जाणारी आहे.

भारतीय मानसिकतेचा विचार करून ऑटोमोबाइल क्षेत्रात भारतात हॅचबॅक गाडय़ांचा विचार प्रामुख्याने केला जातो. पण या हॅचबॅक श्रेणीतीली गाडय़ांमध्येही अद्ययावत प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने या गाडय़ा परफॉर्मन्सच्या बाबतीत सेडान गाडय़ांच्या तोडीस तोड आहे. टोयोटा कंपनीची इटियॉस लिव्हा ही हॅचबॅकही याच वर्गात मोडणारी गाडी आहे..

अरुंद आणि गल्लीबोळांचे रस्ते, महामार्गावरही सर्रास आढळणारे गतिरोधक, बाराही महिने रस्त्यांच्या पाचवीला पुजलेले खड्डे यांमुळे भारतीय रस्त्यांवर सेडान गाडय़ा चालवण्यासारखा त्रासदायक प्रकार नाही. त्यामुळे आणि भारतीयांच्या मायलेज मानसिकतेमुळे पहिल्यापासूनच भारतात हॅचबॅक श्रेणीतील गाडय़ांची मागणी जास्त आहे. मध्यमवर्गीयांना परवडू शकणाऱ्या या हॅचबॅक गाडय़ा परफॉर्मन्सच्या दृष्टीनेही तोडीस तोड बनवण्यासाठी ऑटोमोबाइल कंपन्यांनीही कंबर कसली आणि त्यातूनच सध्याची प्रीमियम हॅचबॅक श्रेणी अस्तित्वात आली. ह्युंदाई आय-२०, होंडा जॅझ, फोक्सवॅगन पोलो, मारुती सुझुकी बलेनो वगरे याच पंक्तीतील गाडय़ा! पण या गाडय़ांच्या स्पध्रेत लुक्सच्या बाबतीत कमी असली, तरीही परफॉर्मन्सच्या बाबतीत तेवढय़ाच सरस असलेल्या टोयोटाच्या इटियॉस लिव्हा या गाडीची दखल घेणे गरजेचे आहे.

अंतर्गत रचना

मगाशी म्हटल्याप्रमाणे गाडीचा डॅशबोर्ड याच कंपनीच्या सेडान गाडीसारखाच असल्याने गाडीत शिरल्या शिरल्या प्रशस्त फील येतो. वातानुकूलन प्रणालीसाठीचे चार व्हेंट्स, लेदर गीअर्स, डॅशबोर्डच्या मध्यभागी असलेला मल्टीमीडिया प्लेअर, त्याखाली वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण करण्यासाठी दिलेली बटणे आदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सौंदर्यदृष्टी ठेवून आखल्या आहेत. गाडी पाच जणांसाठी असून मागच्या सीटवर तीन जण आरामात बसू शकतात. गाडीच्या डॅशबोर्डवर पेट्रोल, ऑइल आदींसाठी दिलेले इंडिकेटर्स जरा मोठे हवे होते, असे वाटते. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसून हे इंडिकेटर्स बघणे थोडे कठीण जाते. पण जमेची बाजू म्हणजे चालकाला बसल्या बसल्या अनेक गोष्टी स्टिअिरग व्हीलवर आणि बाजूच्या पॅनलवर कंट्रोल करता येतात. गाडीची बूट स्पेसही हॅचबॅक श्रेणीच्या तुलनेत चांगलीच म्हणजे २५१ लिटर्स एवढी आहे. त्याशिवाय मागची सीट फोल्ड करता येणे शक्य असल्याने त्याचाही फायदा होतो.

लुक्स

हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत निसान मायक्रा किंवा डॅटसन गो यांच्या जवळ जाणारी आहे. गोलाकार डिझाइन्सचा पुरेपूर वापर करत इटालियन ऑटोमोबाइल क्षेत्रातील काही देखण्या गाडय़ांच्या जवळपास ही गाडी पोहोचते. गाडीचं ग्रिल आणि पुढील भाग हा साधारण टोयोटाच्याच इटियॉस सेडान गाडीसारखा आहे. किंबहुना गाडीचा पुढील भाग आणि आतील डॅशबोर्ड यात दोन्ही श्रेणींमध्ये काहीच फरक नाही. गाडीच्या ग्रिलजवळ टोकदार होत गेलेले आणि बाहेरच्या बाजूला अंडाकृती असलेले हेडलाइट्स, ग्रिलखाली टायरजवळ असलेले फॉग लॅम्प्स, गाडीच्या बाजूच्या आरशांना असलेले सिग्नल दाखवणारे एलईडी दिवे, यामुळे गाडी समोरून बघताना डौलदार वाटते. गाडीच्या मागचा भागही तसाच दिसतो. त्याशिवाय रूफ अँटेना असल्याने गाडीला एकदम स्पोर्टी लुक येतो. त्याशिवाय मागच्या काचेला असलेला वायपर, टेल लाइट्स हेदेखील आकर्षक आहेत.

इंजिन

ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल श्रेणीत ११९७ सीसी एवढय़ा क्षमतेचे इंजिन असून या इंजिनचा टॉर्क १०४ एनएम एवढा आहे. कंपनीच्या मते पेट्रोल श्रेणीचे इंजिन १८ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. डिझेल श्रेणीच्या इंजिनची क्षमता १३६४ सीसी एवढी आहे. या इंजिनचा टॉर्क १७० एनएम असून ही गाडी कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे २३.५. किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते.

कम्फर्ट

ही गाडी ुंदाई आय-२० वगरेंशी तुलना करणारी असल्याचे सांगितले जात असले, तरी कम्फर्टच्या बाबतीत काहीशी कमी पडते. गाडीत मॅन्युअल एअरकंडिशन, ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या व्यक्तीला व्हॅनिटी मिर्स, रिअर पाìकग सेन्सर्स आदी बेसिक गोष्टी वगळल्यास कम्फर्टसाठी फार काही गाडीत दिलेले नाही. कीलेस सेंट्रल लॉकिंग असले, तरी स्पीड सेिन्सग डोअर लॉक्स नाही. गाडीत मनोरंजनासाठी इंटिग्रेटेड म्यूझिक सिस्टिम आहे. ब्लूटूथने मोबाइल गाडीला कनेक्ट करता येऊ शकतो, यूएसबी आणि ऑक्झिलरी कंट्रोलही दिले आहे.

सुरक्षा

सुरक्षेच्या दृष्टीने गाडीत चालक आणि त्याच्या बाजूच्या व्यक्तीला एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच सीटबेल्ट न लावल्यास गाडी तशी सूचना देते. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, आदी गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने पुरवण्यात आल्या आहेत.

किंमत

हॅचबॅक श्रेणीतील असूनही या गाडीची किंमत फीचर्सच्या मानाने जास्त वाटते. ही गाडी ५.७६ लाखांपासून ७.६३ लाख या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

rohan.tillu@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 1:07 am

Web Title: sedan hatchback car
Next Stories
1 टॉप गीअर : होंडाचा अ‍ॅक्टिवा नावाचा ‘युनिकॉर्न’
2 कोणती कार घेऊ?
3 जीप कॅम्प
Just Now!
X