महिंद्राच्या टीयूव्ही३०० या एसयूव्हीला कारप्रेमींनी पसंतीची पावती दिली आहे. या पाश्र्वभूमीवर टीयूव्ही आणखी दमदार आणि शक्तिशाली रूपात नुकतीच सादर करण्यात आली आहे. टीयूव्ही३००ला आता एमहॉक १०० या ताकदवाद इंजिनाची जोड देण्यात आली आहे. नवीन इंजिनासह टीयूव्ही३०० टी८ आणि टी८ एएमटी या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एमहॉक१०० इंजिन असलेल्या टीयूव्ही३०० ची किंमत आठ लाख ८७ हजार रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे. टीयूव्ही३०० ही ऑटोशिफ्ट ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी (एएमटी) देणारी देशातील पहिली एसयूव्ही आहे. तसेच रिफाइन्ड ऑटोमॅटिक गीअर बदलणे आणि कोणत्याही तणावाशिवाय गाडीच्या ड्रायव्हिंगचा आनंद यातून मिळू शकतो. टीयूव्ही३०० मधील दुसऱ्या रांगेतील उत्तम कुशनच्या आसनव्यवस्थेमुळे अधिक आरामदायी प्रवास घडतो.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2016 रोजी प्रकाशित
ऑटो न्यूज.. : महिंद्राची टीयूव्ही आता अधिक शक्तिशाली
टीयूव्ही३००ला आता एमहॉक १०० या ताकदवाद इंजिनाची जोड देण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-05-2016 at 03:26 IST
मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta auto news