नवीन कार मिळण्यातील आनंद खूप आहे आणि ती जर तुमची आयुष्यातील पहिली कार असेल तर अधिकच. नवीन कार अधिक गुळगुळीत, तिचा सुगंध, तिचा रंग आणि सारेच काही आल्हाददायक असते. पण याचबरोबर अशा कारबरोबर नवे काही घटकही आपसूक येतात जे दुर्लक्षून चालणार नाही. नवी कार घेतली की ती जपणे आलेच. तिला धक्का लागता कामा नये. साधे खरचटणेही नको. तिला खोबाही पडता कामा नये; पण आजकाल वाहतुकीची स्थिती पाहिली की आपली कार चांगल्या स्थितीत राहील की नाही याबाबत अधिक धास्ती वाटते.

कारमधील अंतर्गत रचना आहे तशी ठेवणे खूपच सोपे आहे; पण कारचा बाह्य़ भाग. त्यावर आपले पूर्णपणे नियंत्रण शक्यच नाही. पर्यावरण घटकांपुढे तर आपला काहीच इलाज नाही. कार पार्किंग करताना आपण तिच्यासाठीही सावली शोधत असतो, कारण प्रखर सूर्यकिरण कारच्या नेमक्या भागावर पडतात आणि तेथील रंग फिकट होऊन काळसर डाग पडू लागतात. व्हॅक्स कोटिंगही नाहीसे होते. ज्या भागात चिखल अथवा माती असते तो अधिक खराब होतो.

बंद पार्किंग नसेल तर कारवर अधिक विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीतही कारचा मूळ रंग कायम ठेवण्याकरिता पर्याय आहे. विनायल कार रॅपिंग. ही पद्धती तुमची कार जुनी असो वा नवी, रंग बदलण्यासाठी उपयुक्त आहे. विनायल हे सिंथेटिक रेझिन आहे किंवा प्लॅस्टिक पॉलिमर म्हणता येईल. ते कारवरील रंग टिकवून ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरते. एका नव्या रंगाचे आच्छादनच कारवर याद्वारे तयार होते.

पारंपरिक रंगकामापेक्षा ही पद्धती अधिक सोपी आहे. जलद तर ती आहेच शिवाय आर्थिकदृष्टय़ाही परवडणारी आहे. रंगकाम ही वेळकाढू पद्धती आहे. त्यासाठी कार तुम्हाला गॅरेजला द्यावी लागते. त्यात काही दिवस जातात. मात्र ही सुलभ सुविधा केवळ एकाच दिवसात पूर्ण होते.

तर या नवा रंग देऊ करणाऱ्या फिल्मही अधिक आकर्षक, रंगतदार असतात. त्यावरील कार्बन फायबर दिसायला तर चांगले असतेच, शिवाय तुमचे वाहन तुम्ही निर्धोकपणे उघडय़ावर ठेवू शकता. बरे, ही फिल्म जर तुम्हाला काढायची झाली तर तिचा मूळ रंगही तसाच राहतो. त्यामुळे तुमची कार नवीनच राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पद्धती कारवर अवलंबिण्याचा खर्च १० हजार रुपयांपासून पुढे आहे. ३एम हे नाव या क्षेत्रात बहुचर्चित आणि मानाचे आहे. तेव्हा तुमची कार नवीन ठेवण्यासाठी तुम्ही या यंत्रणेद्वारे आग्रही राहायला हरकत नाही.

pranavsonone@gmail.com