सर मी आत्ताच मोटार चालवण्यासाठीचा वर्ग सुरू केला आहे. मला सरावासाठी सेकंडहँड गाडी हवी आहे. तर मी कोणत्या कंपन्यांची गाडी घेऊ शकतो. कृपया मार्गदर्शन करा.

पराग बडगुजर, कल्याण

तुम्ही ह्युंदाई  आय १० घ्यावी. या गाडय़ा सेकंडहँडमध्ये अगदी अल्प दरात मिळतात. तसेच तिला कमी मेन्टेनन्स आहे.

 मी मागील तीन वर्षांपूर्वी स्विफ्ट डिझायर एलएक्सआय (पेट्रोल) घेतली. मासिक प्रवास किमान ३०० किमी आहे. मेन्टेनन्स प्रति ५ हजार किमीनंतर केला जातो. अजून किती वर्षे ही कार मी वापरू शकतो. कृपया मार्गदर्शन करा.

मनोज करंदीकर

तुम्ही अजून आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता. गाडी उत्तम आहे. मायलेज देणारी आहे. योग्य सस्पेंशन आणि इंजिनची काळजी घेण्यास विसरू नका.

 मी प्रथमच गाडी घेत असून माझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. माझा मासिक प्रवास सरासरी १५०० ते २ हजार किमीचा आहे. मला सेडान श्रेणीतील जवळपास २५ किमी मायलेज देणारी गाडी सुचवा. मी होंडा सिटीचा विचार करीत आहे.

प्रा. डॉ. गणेश गाडेकर, वर्धा

डिझेलमध्ये तुम्ही मारुती सियाझचा विचार करावा. यामध्ये स्मार्ट हायब्रिड इंजिन असून, मायलेजही उत्तम आहे. यानंतर ह्युंदाई वेर्ना किंवा फोक्सवॅगन व्हेन्टो यांचा विचार करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ls.driveit@gmail.com