काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नात्यातील एका ताईच्या लग्नासाठी मी गेले होते. नवऱ्या मुलीला वडील नव्हते, पण आईने लेकीच्या लग्नात काही कमी ठेवली नव्हती. कसं होईल, कसं होईल असं नुसतंच म्हणणाऱ्या नातेवाईकांच्या बोलण्याकडे आणि टोमण्यांकडे कानाडोळा करत त्यांनी मुलीचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं. बरं, त्यावरही “एवढे पैसे कुठून आले?”, असा नातेवाईंकाचा रोख होताच! आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची स्वप्न आईवडिलांनी त्यांच्या जन्माअगोदरच रंगवलेली असतात. अगदी तसं करणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. पण आपल्या परीने आईवडील मुलांच्या कोणत्याच कार्यक्रमात काहीही कमी पडू द्यायचं नाही, याची पुरेपूर काळजी घेतात. नवरा नसल्यामुळे अर्थातच लेकीच्या लग्नाच्या खर्चाचा सगळा भार काकूंवरच होता. पण, तरीही त्यांनी लग्न अगदी थाटामाटात पार पाडलं.

नातेवाईकांची मदत व सल्ले न घेता एकटीने लग्नाचा भार उचलल्यामुळे त्यांना भर लग्नात टोमणेही ऐकावे लागत होते. पण, आपल्याच कार्यक्रमात धिंगाणा नको, म्हणूनच त्या शांत होत्या. लेकीच्या लग्नात वरमाई म्हणजे काकू अगदी छान नटून थटून तयार झाल्या होत्या. मुलीच्या आग्रहास्तव त्यांनी स्वत:साठी खास पोपटी रंगाची पैठणी घेतली होती. अगदी टापटीप पैठणी नेसून, आंबाडा घालून त्या छान नटल्या होत्या. आणि कदाचित त्यामुळेच सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. त्यातील काहींच्या नजरांमध्ये काकूंचं कौतुक होतं, तर काहींच्या नजरांमध्ये काकूंसाठी द्वेष!

Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

आणखी वाचा>> पतीचं वर्षश्राद्ध आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी करणारी ‘ती’

मुलीच्या जवळचे काही नातेवाईक नाराज असल्यामुळे लग्नातही ते दूर दूरच बसले होते. पैठणीत मिरवणाऱ्या काकूंकडे पाहून अखेर मुलीच्या सख्या चुलत भावाने तोंड उघडलंच. “विधवा आहे आणि पैठणी नेसून मिरवतेय बघ कशी”, असं तो म्हणाला. त्यांच्या ग्रुपमधील सगळ्यांच्याच तोंडचं वाक्य जणू त्याने घेतलं होतं. कारण तो असं म्हणाल्यानंतर सगळ्यांनीच काकूंना नावं ठेवायला सुरुवात केली. मी त्यांच्या पुढच्याच रांगेत बसल्यामुळे मला त्यांचं बोलणं स्पष्टपणे ऐकू येत होतं. मुलीच्या चुलत भावाने टिप्पणी केल्यानंतर मग सगळ्यांनीच वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मुलीची दुसरी काकू म्हणाली, “अगदी बरोबर बोललास, पैठणी ती पैठणी वरुन हिरवाच कलर मिळाला हिला. आणि वरुन किती मेकअप केलाय बघ”. लगेचच काकांनीही “नवरा मेलाय आणि केसांना मेहेंदी वगैरे लावतेय” असं म्हणत त्यांच्या अकलेचे तारे तोडले. “नवरा गेल्याचं काही आहे की नाही,  शोभतं का असं वागणं. संपूर्ण कुटुंबाची इज्जत घालवली”, असं मत मुलीच्या मोठ्या काकूने मांडलं.

आणखी वाचा>> काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

बरं, त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात तिडीकच गेली. म्हणजे, आपल्याच कुटुंबातील व्यक्तीबाबत असा विचार कोणी कसं काय करू शकतं. मुळात, त्या काकूंचा नवरा जाऊन कित्येक वर्षे झाली होती. मुलीच्या नातेवाईंकाना मला खडसावून सांगावंसं वाटत होतं. “नवरा नसलेल्या बायकांनी कसं राहायचं, हा ठरवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? पूर्वीच्या काळातही केशवपन समाजसुधारकांनी बंद पाडले आणि विधवेचा पुनर्विवाह यांसारख्या नव्या गोष्टी सुरू केल्या. पण विधवांना मिळणारी वागणूक आजही काही प्रमाणात तशीच आहे. पैठणी नेसण्याचा अधिकार विधवांना नाही, हे ठरवणारे तुम्ही-आम्ही कोण? मुळात, पैठणी हा एक साडीचा प्रकार आहे. त्यामुळे पैठणी विधवा महिलांनी नेसू नये, असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि विधवांनी नट्टापट्टा केला, तर त्यात चुकीचं काय आहे? नवरा गेला म्हणून आयुष्यभर त्याच दु:खात राहून उरलेल्या आयुष्याची राखरांगोळी करायची का? लेकीच्या लग्नात वडील नाहीत याचं दु:ख तिला व तिच्या आईपेक्षा जास्त कोणालाच कळू शकत नाही. आपण केवळ बोलू शकतो. पण त्यांच्या मनात तेव्हा भावनेचं व विचारांचं वादळ उठलेलं असतं. पण काळजावर दगड ठेवून त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असतात”. पण ओठांपर्यंत आलेले माझे शब्द मी गिळून टाकले. कारण, काही माणसांना वेळप्रसंगाचं भान नसतं, पण अशावेळी सगळं सुरळीत पार पाडावं म्हणून आपणच शहाणपणा दाखवायचा असतो!