डॉ. उल्का नातू-गडम

सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करताना प्रथम करतात ते ‘प्रणमासन’ आणि त्यानंतरचे आसन म्हणजे ‘हस्त उत्थानासन’. त्यानंतर येते ते ‘हस्तपादासन’.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

असे करावे आसन

हस्तपादासन स्वतंत्र रीतीनेही करता येईल. पण समजा आपण हस्तउत्थासनातून पुढे हे आसन करणार असाल, तर हस्तउत्थानासनात हात वर उंचावून मागे नेलेले असतात आणि पाठीला ‘स्ट्रेचिंग’ मिळालेलं असतं. मग हस्तपादासन करण्यासाठी कमरेतून पुढे झुकत दोन्ही हात श्वास सोडत प्रथम जमिनीला समांतर आणि नंतर दोन्ही हात खाली जमिनीवर आणून हातांचे तळवे दोन्ही पावलांच्या बाजूला जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर शक्य झाले तर ठीकच आहे, पण नाही शक्य झाले, तर निदान बोटांची टोके जमिनीला टेकवा. हे करीत असताना पाय गुडघ्यात दुमडू नका.
हस्तपादासनच्याा अंतिम स्थितीत कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. अर्थात कुठलीही जोर-जबस्दस्ती नको. आपण सूर्यनमस्कार करीत असल्यास ‘ॐ‌ सूयार्य नम:’चा जप करा.

आसनाचे फायदे

या आसनाच्या सरावाने पाठीचा कणा, गुडघे, घोटे यांचे स्नायू व पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. मासिक पाळीची पोटदुखी कमी करण्यासाठी, ओटीपोटातील रक्तसंचय कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

शुचिता आणि संतोष यानंतरचा तिसरा नियम सांगितला जातो, तो ‘तप’. जुन्या कथा, कहाण्यांमधून एखाद्या ऋषींनी अनेक वर्ष तप केल्यानंतर एखादी सिद्धी प्राप्त झाल्याची कथा आपण लहानपणी ऐकलेली असते. त्या वेळी तप म्हणजे एका पायावर उन्हात उभे राहाणे किंवा पाण्यात उभे राहाणे किंवा शरीराला त्रास देऊन घोर रानावनात तप करणे, तासंतास डोळे मिटून ध्यान करणे इत्यादी दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभी राहातात. पण ‘तप’ या शब्दाचा खरा अर्थ खूप वेगळा आहे.

‘तप: द्वंद्व सहनम्’ म्हणजे आयुष्यातील द्वंद्वे सहन करण्याची ताकद मिळवणे असा अर्थ आहे. म्हणजेच तहान-भूक, शीत-उष्ण, सुख-दु:ख, मान-अपमान या साऱ्या द्वंद्वांना सहन करण्याची ताकद आणणे म्हणजेच तप आहे. हे वाटते तितके सोपे नाही. रोजच्या दिनचर्येत आपल्याला अस्वस्थ करणारे, सहनशक्तीचा अंत पाहणारे खूप प्रसंग घडत असतात. रोज आपला रक्तदाबाचा आणि नाडीचा आलेख खूपच आंदोलने दाखवित असतो. या साऱ्याचा समतोल सांभाळणे अजिबात सोपे नाही. परंतु हा प्रयत्न म्हणजेच सर्वे कर्मे (चांगली आणि वाईट) ‘तापवून’, ‘भाजून’ त्याची ‘अंकुरण्याची’ क्षमता नष्ट करणे म्हणजेच तप आहे. प्रयत्न तर करू या, या ‘दग्धबीज’ अवस्थेत पोचण्याचा! स्टेशन माहिती असेल तर प्रवासाची दिशा नक्कीच ठरवता येते. सूर्यनमस्कारातील विविध आसनांचा उपयोग अशा गोष्टी समजून घेण्यासाठी आणि शांतता प्राप्त करण्यासाठी निश्चित करता येईल.