भारतीय समाज आणि परंपरेत मासिक पाळी व स्त्री या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. या संदर्भातील अनेक धार्मिक रूढी व परंपरांचा पगडा समाजमनावर आहे. पाळी असलेल्या स्त्रियांना अनेक ठिकाणांपासून आणि कामांपासून लांब ठेवण्यात येतं. तिचा वावर अशुभ मानण्यात येतो. धार्मिक कार्यात तर सहभागीच होऊ दिलं जात नाही. मासिक पाळीबद्दल जर एवढ्या मोठ्या पातळीवर समज- गैरसमज असतील तर या कालावधीत शरीर संबंध ठेवावेत की न ठेवावेत याबद्दल तर बोलायलाच नको. अर्थात जुन्या जाणत्या पिढीच्या मनामध्ये याबद्दलच्या ठाम भूमिका आहेत. तर नव्या पिढीला या संदर्भात अधिक माहिती घेण्याची आवश्यकता आहेच.

अनेक जोडपी ‘ती’च्या मासिक पाळी दरम्यान सेक्स करतात. त्यांना त्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही आणि खरंतर ही गोष्ट अतिशय सामान्य आहे पण त्याबद्दल कधीही चर्चा मात्र होत नाही. कारण कदाचित लोकांना काय वाटेल, हा प्रश्न किंवा हा विचार अनेकांच्या मनात येत असतो. मासिक पाळी दरम्यान सेक्सची इच्छा झाली तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

(आणखी वाचा: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये वाढतो ‘ऑस्टिओपोरोसिस’चा धोका; ‘या’ लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष ठरेल घातक)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही मासिक पाळीदरम्यान सेक्स केल्यास मासिक पाळी मध्ये येणाऱ्या क्रॅम्पपासून तुम्हाला सुटका मिळते. कारण सेक्स नंतर एंडॉर्फिन्स रीलीज होतात, जे तुमच्यातील तणाव आणि होणारा त्रास दोन्ही कमी करतात. त्यामुळे तुम्हाला क्रॅम्प प्रॉब्लेम असेल तर या पर्यायाने आराम मिळण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास तुमच्या शरीरातील मेस्ट्रुअल टिश्यूजचा फ्लो वाढतो. त्यामुळे तुमची मासिक पाळी जास्त काळ राहत नाही. तसंच क्लाऊटिंगचा प्रॉब्लेमही यामुळे निघून जाण्याची शक्यता असते.

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणाऱ्यांची संख्याही एका सर्वेक्षणानुसार ३० टक्क्यांच्या आसपास आहे, त्यांना यामध्ये काहीही चुकीचं वाटतं नाही. तसंच मासिक पाळी दरम्यान सेक्स करताना त्यांना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. तर काहीजण असेही असतात ज्यांना त्यावेळी शरीरसंबंध ठेवणे चुकीचं वाटत. त्यादरम्यान होणारा रक्तस्त्राव यामुळे सेक्स करण्याची इच्छाही होत नाही. त्यामुळे मासिकपाळी दरम्यान सेक्स करताना तुमच्या मनाची किती तयारी आहे किंवा तुमच्या जोडीदारच मत पाहणे गरजेचे आहे.

(आणखी वाचा: विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक)

STI म्हणजे सेक्सच्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन यादरम्यान इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. कारण पूर्ण महिन्याच्या तुलनेत यावेळी तुमच्या गर्भाशयाच्या मुखाचे तोंड अधिक प्रमाणात उघडे राहते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान, सेक्सचा निर्णय घेतला तर तुमच्या जोडीदाराने कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत तुमच्या तब्येतीची अवस्था नक्कीच थोडी बदलते. तुमच्या शरीरातील हार्मोन्स रीलीज होतात आणि तुम्हाला नक्कीच सेक्स करण्याची इच्छा होत असते, हे नैसर्गिक आहे. तिसऱ्या ते चौथ्या दिवशी असा मूड नक्कीच असतो. त्यावेळी कंडोमचा वापर केल्यास तुमच्या शरीरालाही थोडासा आराम मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे, यात काहीच गैर नाही जर जोडप्यामध्ये दोघांनाही काहीही अडचण नसेल तर शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे. मात्र मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कारण रक्त हे असं माध्यम आहे ज्यामधून एखादे इन्फेक्शन झपाट्याने पसरू शकते. अशावेळी जोडीदारापैकी एकालाही इन्फेक्शन असेल तर ते लगेच संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काही जोडीदार असेही असतात ज्यांना दररोज सेक्स करण्याची इच्छा होत असते. त्यामुळे मासिकपाळी दरम्यान सेक्स न करण्याच्या प्रथेनुसार, महिलेला किमान त्या दरम्यान तरी या कारणाने विश्रांती मिळत असते. त्यामुळे तिच्याही शरीराला आराम मिळतो. मासिकपाळी दरम्यान सेक्स करण्याबाबत सर्वात महत्त्वाचे आहे ते तुमच्या जोडीदाराचं म्हणणं. यासंदर्भात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संकोच न करता बोलायला हवं. त्याला किंवा तिला काय वाटतं, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुमची कम्फर्ट लेव्हल पाहू सेक्सचा निर्णय घेऊ शकता.