पल्लवी सावंत पटवर्धन

आहार आणि त्यासंबंधी सुरु होणारे नवनवीन ट्रेण्डस् हाही आहार जगतातला एक ट्रेण्ड म्हणायला हवा. किटो, पॅलिओ , नो कार्ब आणि तत्सम आहार पद्धतींनी पाश्चात्त्य जगतासोबत भारतीयांना देखील मोहित केलेलं आहे. इथे मोहित हा शब्द मुद्दाम वापरलाय कारण अनेकदा एखाद्या प्रलोभनाला बळी पडावं तसं “हे काहीतरी नवीन दिसतंय करून बघू ” असं म्हणत आपण या प्रकारच्या ट्रेण्डस् च्या शब्दशः आहारी जात आहोत. ‘मी केलं तुम्हीही करा’ या तत्त्वाखाली अनेकजण चुकीच्या आहारपद्धतींना बळी पडतात .
तुम्ही म्हणाल झालंय काय ?

What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Husband wife relationship There is no way to get angry Patience is essential
तुमच्याही बाबतीत असं घडतंय?
ginger-lime benefits
आले-लिंबाच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात….
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया

आणखी वाचा: विवाहपूर्व मार्गदर्शन : पालक लग्नासाठी फार मागे लागतात…

अलीकडेच आहार अचानक बदलल्यामुळे मृत्यू अशा बातम्यांचं प्रमाण वाढलंय.
इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की, खरंच अचानक आहार बदलामुळे असं होऊ शकत का?
या सगळ्या घटनांमध्ये त्या व्यक्तीच्या रक्त चाचण्या करून त्याप्रमाणे आहाराचा सल्ला दिला गेला होता का?
आहाराबद्दल सल्ला आहारतज्ज्ञांकडून घेतला गेला होता का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आहारासाठी येणाऱ्यांपैकी अनेक जण केवळ वजन कमी करणे या उद्देशाने आहारतज्ज्ञांकडे जातात. खरं तरं आहार तज्ज्ञांकडे सल्लामसलत करताना शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता, अनुवांशिक आजार, जनुकीय वैशिष्ट्ये, दिनचर्या याची पडताळणी करणे आवश्यक असते. आपलं वजन आपल्या शरीराचा, जडणघडणीचा, दैनंदिन जीवनाचा आरसा असतं.
ते कमी किंवा जास्त असू शकत. वजन वाढणं- कमी होणं हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. अचानक उपास करणं. एखादा अन्नघटक किंवा पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणं. या प्रकारच्या आहारामुळे आपण कुपोषणाला बळी पडू शकतो. म्हणजे नक्की काय होतं?

आणखी वाचा: बघतोय रिक्षावाला… आरशातून !

आपलं वजन वाढलेले आहे, हे आपल्याला कधी कळतं? नेहमीचे कपडे घट्ट होणं किंवा न बसणं, गुडघे दुखणं हे खरं तर उशीर झाल्यावर घडत. त्याही आधी लवकर थकवा येणं, शरीरातील ऊर्जा कमी वाटणं, कायम मरगळ वाटणं . एखादा पदार्थ खूप जास्त खावासा वाटण (यात गोड, तिखट, आंबट पदार्थांचादेखील समावेश आहे), जेवताना किती खाल्लं जातंय किंवा जात नाहीये याचं भान न राहणं इत्यादी अनेक लहान- लहान गोष्टीतून शरीर आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतं . परंतु कोणत्या न कोणत्या कारणाने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

आणखी वाचा: तणावपूर्ण जीवनशैलीही विस्मरणाला कारणीभूत!

कोणतीही आहार पद्धती स्वीकारताना आधी आपल्या प्राथमिक रक्त तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
रक्तातील लोह, कॅल्शिअम , जीवनसत्त्वे ( व्हिटॅमिन्स ) चे प्रमाण ( व्हिटॅमिन डी, बी १२ ), कोलेस्ट्रेरॉल , साखर यांचे प्रमाण जाणून घेणे गरजेचे आहे. यापैकी एकही घटक कमी किंवा जास्त असेल तर आहारतज्ज्ञ नेहमी सुरुवातील सकस आहार देऊन जीवनसत्त्वांची पातळी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. यापैकी एक घटक कमी असल्यास शरीरावर कोणत्याही फॅड (ज्याला मी इंग्रजीत फास्ट आणि डेफिशिएंट असं नाव दिलंय ) डाएट चा विपरीत परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा: SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !

अलीकडेच पॅलिओ डाएट करून प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तीमध्ये मधुमेहाची सुरुवात आहे हे लक्षात न घेतल्यामुळे शरीरातील अवयव निकामी होऊन प्राण गमावण्याची वेळ आली होती. आहारतज्ज्ञ म्हणून पॅलिओ डाएटचा विचार करताना हे पॅलिओ / पॅलिओलिथिक डाएट म्हणजे आहे ते आधी जाणून घेऊ
१. धान्यांचा शून्य वापर
२. कॅलरीजचा कमी विचार
३. प्रथिनेयुक्त आहार ( प्राणिजन्य आणि वनस्पतीजन्य मासे, अंडी यांचा जास्तीचा समावेश )
४. दूध नि दुग्धजन्य पदार्थच शून्य वापर
म्हणजे आहारशास्त्राप्रमाणे पाहायला गेलं तर ३५% कर्बोदके ३५% स्निग्ध पदार्थ आणि ३०% प्रथिने असे मुख्य पोषणतत्वाचे प्रमाण या आहार पद्धतीत राखले गेले आहे . आहार नियमन करताना ज्याला आपण प्रमाणात खाणं किंवा पोर्शन असं म्हणतो त्याला इथे अजिबात वाव नाही .
पदार्थ कमी शिजवणे यावर देखील पॅलिओ डाएट जास्त भर देतं
वरील सगळे मुद्दे लक्षात घेता – हा ट्रेण्ड पुन्हा अतिरिक्त प्रथिने, कमी कर्बोदके आणि पर्यायाने अतिरिक्त स्निग्ध पदार्थांवर भर देत असल्याचे ठळकपणे जाणवते. याला आधार म्हणून पूर्वीच्या काळी आदिमानवाच्या आहारपद्धतींचा देखील निकष लावला जातोय.

आणखी वाचा: ‘या’ शाळकरी मुली अंतराळात पाठवणार उपग्रह !

हे सगळे लक्षात घेता या जास्त प्रथिनांमुळे वजन निश्चित कमी होईल पण पोषणतत्वांचं काय करावं? आणि ज्यांना मांसाहाराची सवय नाही त्यांनी जाणीवपूर्वक कितपत बदल घडवून आणावा हाही प्रश्न आहेच.
माणूस म्हणून आपण विविध ठिकाणी, विविध तापमानाच्या शहरात, विविध वेळेत, विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांमध्ये राहतो जगतो. अचानक केलेल्या या बदलांमुळे पुढील परिणाम होऊ शकतात.
१. लवकर थकवा येणं
२. शरीरातील चरबी कमी होणं आणि काही कालावधीने शरीरात चरबीचा साठा तसाच राहणं
३. तोंडाला दुर्गंधी येणे
४. केस गळणे
५. त्वचेचे तेज कमी होणे

आणखी वाचा: मॅट्रिमोनिअल साइट्सवर शोधत आहात आयुष्याचा जोडीदार? फसवणुकीपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

पॅलिओ डाएट केलेल्या लोकांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे .
केटोसिस म्हणजे बोलीभाषेत ज्याला आपण शरीरातील चरबी /अतिरिक्त फॅट जाळण्याची प्रक्रिया असे म्हणतो ती प्रक्रिया प्रथिने योग्य प्रमाणात घेतल्यास सुरु होते.
प्रथिनांचे योग्य प्रमाण असे मोजावे – (वजन -कि. ग्रॅम X ०.८ ते १ ग्राम – महिलांसाठी किमान ४५ ग्रॅम आणि पुरुषांसाठी किमान ५०-६० ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते) जर त्याहून जास्त प्रथिने आहारात सातत्याने घेतली गेली तर पचनसंस्था आणि इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो

आणखी वाचा: मेंदू आणि शरीराच्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाचीच!

फॅड डाएट्सना बळी पडणारा मोठा वर्ग हा आवडते पदार्थ कधीही, कसेही, कितीही या नियमाला बळी पडतो कारण जे खाऊ ते व्यायामाने पचवू असा गोड़ गैरसमज पसरवणारा सल्लागार वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे .
आणि आहारतज्ज्ञ म्हणून प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट अशी आहे – कॅलरीज, पोषणतत्त्वे, जीवनसत्त्वे यासोबत या आड शिस्तीचा खाणाऱ्याच्या मनावर काय परिणाम होतोय हे जाणून घेणे देखील तितकेच आवश्यक आहे .
आपल्या शरीराला शिस्त लावताना किमान २० दिवस इतका कालावधी द्यायला हवा. २४ तास सातत्याने काम करणाऱ्या शरीराला आणि कदाचित त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या वजनाला एवढा वेळ तर द्यायलाच हवा !
तुमच्याच शरीरासाठी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीने तुम्हाला किमान उत्साही तरी वाटायला हवं. आहार नियमन अर्थात डाएटचे वेगवेगळे ‘स्व’ उपचार करणाऱ्या वर्गांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे . आणि याच स्त्रियांमध्ये खाण्याबद्दलची भीती आणि पदार्थांबद्दलचे गैरसमज यामुळे नैराश्य येण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. हे चित्र सुधारण्याची सामाजिक जबाबदारीदेखील आपलीच आहे

आणखी वाचा: अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?

कोणतेही आहार पद्धती अवलंबताना – आपली फॅमिली हिस्ट्री ( अनुवांशिकआजार पडताळणी) / रक्त घटक तपासणी (कोलेस्टेरॉल, ट्राय ग्लिसेराईड, हिमोग्लोबिन, लोहाचे प्रमाण), जीवनसत्त्वे, आपली जीवनशैली याचा विचार करून त्याप्रमाणे हळूहळू बदल करायला हवेत. आपणच स्वतःहून आपल्या शरीराची काळजी घेताना त्याचं संगोपन करताना प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने तज्ज्ञांकडून आहार मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे.

aaharpallavi@gmail.com