रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाचा त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत असल्यामुळे रिक्षांमधील चालकाच्यासमोरील आरसे त्वरित हटविण्यात यावेत, असा आग्रही विनंतीअर्ज एका एनजीओने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाहतूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. वाहनांना रिअर व्ह्यू आरसे असतात. ऐन गर्दीमध्ये किंवा अन्य वेळीही दोन वाहनांतील सुरक्षित अंतर राखणे सोयीचे व्हावे आणि प्रवासीसुरक्षा असे दोन हेतू त्यामागे असतात. मात्र चारचाकी वाहनांव्यतिरिक्त रिक्षासारख्या वाहनांमध्ये चालकाच्या समोरच्या बाजूसही एक आरसा अनेकदा असतो, या आरशाची आवश्यकता नाही. रिक्षांना असलेले साईड व्ह्यू आरसे चालकांसाठी पुरेसे आहेत. असे असतानाही चालकासमोर बसवलेल्या रिअर व्ह्यू आरशातून काही रिक्षावाले रिक्षेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना वारंवार न्याहाळत असतात, म्हणूनच या आरशांवर एनजीओंनी आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा : …त्याचं कारण फक्त ‘बिग बॉस’च!

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Queues at reservation centers due to technical glitch in STs app
एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा

काही प्रसंगी तरूणी एकट्याच प्रवास करत असतील तर रिक्षाचालकांच्या या गैरवर्तनामुळे त्यांना अवघडलेल्या, संकोचलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागतो. शिवाय रिक्षाचालकांच्या अशा बेशिस्त वागण्यामुळे अपघाताची शक्यताही वाढीस लागते, असे वॉचडॉग फाउंडेशन या एनजीओने विनंतीअर्जातील कारणामध्ये स्पष्ट म्हटले आहे. वाहतूक विभागाकडे गेल्या तीन वर्षांत दोन वेळा या स्वरूपाच्या तक्रारी आल्या आहेत. २०१९ साली ठाण्यामध्ये या तक्रारींची दखल घेऊन आरटीओने केलेल्या कारवाईमध्ये ६४ रिक्षाचालक असे गैरवर्तन करताना आढळून आले होते आणि कारवाईअंतर्गत त्या रिक्षांमधील चालकाच्यासमोर असलेला रिअर व्ह्यू आरसा काढूनही टाकण्यात आला होता.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नानंतर वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास काय करावं?

रिक्षासारख्या लहान आणि तीनचाकी वाहनाला डावीउजवीकडे असलेल्या आरशातून पाठीमागून येणारी वाहने सहज दिसून येतात. शिवाय रिक्षाचा मागील भाग हा पारदर्शक काचेचाही नसतो तर तो बहुतांशपणे झाकलेलाच असतो. यामुळे पाठीमागून येणारी वाहने त्यांना रिअर व्ह्यू आरशात पहाताच येणार नसतील तर हा आरसा रिक्षांमधे असण्याची गरजच नाही, असे या एनजीओचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !

वाहतूक नियमाप्रमाणे रिअर व्ह्यू आरसा केवळ तीन इंच रूंद आणि १२ इंच लांबीचा असावा आणि रिक्षाच्या दोन्ही बाजूंना साईड व्ह्यू आरसे असणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही रिक्षाचालक हे या नियमाला हरताळ फासत आरशांच्या लांबी रूंदीमध्ये बदल करतात. यातही कहर म्हणजे साइड व्ह्यू आरशांपैकी एक आरसा तर रिक्षातल्या महिला प्रवाशांचे कपडे, पोशाखाचे प्रतिबिंब पहाता यावे म्हणून अशा रिक्षाचालकांकडून अडजस्ट केला जातो. काही रिक्षाचालक तर इतके निर्ढावलेले असतात की रिअर व्ह्यू आरशातच रिक्षातील तरूणी किंवा महिला प्रवाशाचा चेहरा स्पष्ट दिसेल असा वळवून ठेवतात. रिअर व्ह्यू आरशातून चालक महिलांकडे वारंवार रोखून पहात असेल तर त्याचा मानसिक त्रास हा महिला प्रवाशांना नक्कीच होतो. रिक्षाचालकांचे महिला प्रवाशांना असे निरखत राहणे महिलांच्या तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकते. असे निरखून पाहणे हा एकप्रकारचा जाच असल्याचे मतही काही महिला प्रवाशांनी नोंदवलेले आहे. किंबहुना महिलाविषयक नवीन कायद्यांनुसार हाही एक प्रकारचा विनयभंगच ठरतो.

आणखी वाचा : ‘या’ शाळकरी मुली अंतराळात पाठवणार उपग्रह !

रिक्षामेन्स संघटनेचे नेते थम्पी कुरीअन म्हणतात, की रिक्षामध्ये रिअर व्ह्यू आरसा बसवणं हे रिक्षाचालकांसाठी ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. साइड व्ह्यू आरशांच्यासाह्याने वाहन चालवणे आणि रस्ते सुरक्षा सांभाळणे तुम्हांला शक्य आहे तर रिअर व्ह्यू आरसा काढून टाकावा. काही रिक्षाचालकांनाही याविषयी बोलतं केलं असता ते म्हणाले, की कधी कधी आमच्या रिक्षात काही जोडपी बसतात आणि त्यांचे अतिजवळकीने वागणे हे सार्वजनिक ठिकाणी अयोग्य असू शकते. अशावेळी त्यांना धाक वाटावा आणि त्यांनी असे प्रकार रिक्षात करणे थांबवावे यासाठी आरशातून त्यांच्याकडे पाहणेही कधी कधी पुरेसे ठरते. म्हणून हे आरसे बसविलेले असतात. अद्याप पर्यंत आरटीओ किंवा शासन यांपैकी कुणीही या प्रकरणी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र लवकरच त्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.