डॉ. सारिका सातव
आपल्या देशात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत हे सहा ऋतू आहेत. या ऋतूंमध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यांची विभागणी होते. वातावरणात जसा ऋतूप्रमाणे बदल होतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होत जातो. शरीर आणि वातावरणातील बदलाला अनुसरून आपण आपल्या आहारविहारातही बदल केला पाहिजे. एकच प्रकारचा आहारविहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही म्हणून बदल आवश्यकच असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!

ऋतूनुसार आहारविहारात बदल न केल्यास आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजेच कफ, वात आणि पित्त यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे अनेक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. वाताचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो. त्याचप्रमाणे पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत, तर कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असतो. ऋतूनुसार योग्य आहार घेतल्यानं आपण त्या-त्या ऋतूंमध्ये प्रकोप होणाऱ्या त्रिदोषांना आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधींना तर दूर ठेवू शकतोच, शिवाय योग्य आहार आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असतो. एकंदरच निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ऋतूनुसार आहारविहारात बदल करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

हिवाळ्यातील आहाराच्या वेळा

सध्या थंडी जाणवू लागली आहे. तापमान कमी झाल्याने दिवसाही वातावरणात गारवा जाणवतोय. या ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो. या ऋतूमध्ये आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे हे समजावून घेऊ. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते म्हणून या ऋतूमध्ये आपण जो आहार घेऊ त्यामध्ये अधिक ऊर्जा असणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण लवकर घ्यावे, तसेच रात्री झोपताना दूध जरूर घ्यावे.

आणखी वाचा : उपयुक्त : साडीवरचा पेटिकोट… क्षुल्लक नाही, फार महत्त्वाचा

रात्र मोठी असल्याने सकाळी लवकर (सकाळी ७ ते ८.३० पर्यंत) नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्याला शक्यतो उशीर करू नये किंवा नाश्ता करणे टाळू नये. काही कारणास्तव उशीर होणार असेल तर सुकामेवा- उदा. बदाम, अक्रोड आदी सकाळी उठल्यावर खायला हरकत नाही. सकाळीही दूध लवकर प्यावे.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

शरद ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली असते. भूक चांगली लागते आणि पचनही चांगले होते. त्यामुळे दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका तसेच एका वेळी खूप जेवू नका. दिवसभरातल्या जेवणांमध्ये सकाळची न्याहारी जास्त चांगली असावी. दोन जेवणांमध्ये जास्त अंतर राहिल्यास आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूमध्ये सकाळचा नाश्ता लवकरच घ्यावा. अन्यथा सकाळची उपाशीपोटीची साखर कमी होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप – पप्पांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय…

ज्यांचे वजन खूपच कमी आहे, लहान मुले, जे अंगमेहनतीची कामे जास्त करतात आणि गर्भवती स्त्रिया यांनी तर सकाळच्या न्याहारीला खूप महत्त्व दिले पाहिजे. न्याहारी सकाळी ७ ते ८.३० पर्यंत, दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण, सायंकाळी ४ ते ५ दरम्यान हलका नाश्ता आणि रात्री ८ ते ९ दरम्यान रात्रीचे जेवण अशा वेळा शक्यतो पाळाव्यात.
dr.sarikasatav@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness health tips for winter take meals in time vp
First published on: 21-10-2022 at 23:07 IST