बंगल्याच्या आवारात शिरताच समोर कावेने रंगवलेले मोठे देखणे वृंदावन. त्या भोवती फुलझाडांच्या कुंड्या, दरवाजासमोरच्या पडदीस लटकवलेली सावली, आवडणारी हिरवी झुंबरे, डाव्या बाजूला फरशांची पायवाट अन् त्याच्या दोन्ही बाजूला फुलांचे ताटवे. परसबागेचे असे आखीव रेखीव नियोजन. मी मोठ्या प्रणामात पालापाचोळा गोळा करते, त्याची माती वापरते. या मातीच्या कार्बन नायट्रोजन रेशो योग्य राहण्यासाठी भाजीवाल्याकडून वाया गेलेली भाजी आणते.

माझ्या मैत्रिणीने माझे पाहून लगेच भाजीवाल्याकडून कोबी पाला आणून खड्ड्यात घातला. दोन दिवसांनी फोन आला ‘अगं वास येतोय’. विचारलं, ‘किती कोबी पाला आणलास?’ ‘चार पोती भरून आणला’. ‘कोबी पाल्यात खूप ओलं असते तो पटकन् सडायला लागतो. आता त्यात तीन पट कोरडा पाला मिसळ’ असे मी सांगितले. बाई बहाद्दर तिने पाला गोळा करून घातला व पाला व वाया गेलेली भाजी यापासून एकवीस पोती हिरवी माती तयार केली. त्यावर हिची बाग बहरत आहे. घरच्या घरी माती बनवण्याचे तंत्र गवसले आहे. जैविक कचऱ्यावर झाडे बहरतात हे पक्क ठाऊक आहे. गेल्या वर्षी दर्शनी भागात झेंडूची रोपं लावली होती. तो तरारलेला, फुलांच्या वजनाने लवलेला झेंडू पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. या वेळी त्या जागी बालसम फुलला आहे.

हेही वाचा… गृहकर्ज घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक सोपं!

जास्वंदीचे खूप रंग जमवले आहेत. एका कोपऱ्यात निळी, गुलाबी वॉटर लिली सदा फुललेली असते. त्यात गुलाबी कमळाची भर पडली आहे. जुने टायर रंगवून त्यात फुलझाडे लावली आहेत. कुंपणावर कृष्णकमळ सुगंधी फुलांचे वेल आहेत. भाजीपाला फारसा नाही. घरची कमळे, कवठी चाफ्याचे हार करायचे. दारात फुलांच्या रांगोळ्या घालायच्या याची हिला फार हौस. बँकेतली नोकरी करून हे करायचे तसे अवघड पण सुट्टीच्या दिवशी झाडांवर हात फिरवायला, बहरलेली बाग पाहून मिळालेला आनंद इतरांना वाटायला हिला आवडतं.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून : तृष्णा एक व्याधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एक मैत्रीण. बंगल्यात मोठाली झाड अन् या ऋतूमध्ये होणाऱ्या पानगळीमुळे हैराण झालेली. पण आता पाचोळा ड्रममध्ये, पोत्यामध्ये भरून त्यावर इनोरा कल्चरचे पाणी मारून पोती भरून ठेवते. अधून मधून पाण्याचा फवारा देते. जसे जसे कंपोस्ट तयार होईल तसे वापरते. स्वत: ग्राफीक डिझायनर आहे. घरात येणाऱ्या खोक्यांचा कौशल्याने वापर करून त्यात रताळी, वांगी, मिरची, टोमॅटो, काकडी अशा भाज्या लावते. प्लास्टिक कुंड्यांमध्ये पालेभाज्या, ढोबळी मिरची, पावट्याचे वेल, बेसील लेट्युसही लावले आहे. ‘अगं, एक ड्रम बाजूला राहून गेला. परवा पाहिला तर त्यात सुंदर मुलायम माती तयार झाली होती.’ दिसणाऱ्या अन् न दिसणाऱ्या असंख्या जीवांनी आपली करामत दाखवली होती. ती मैत्रीण आता इतरांनाही कंपोस्ट करण्यासाठी मार्गदर्शन करते.