अपर्णा गोविल भास्कर

पुरुषांप्रमाणे, महिलांमध्ये हर्नियाची लक्षणे बहुतेकदा सूक्ष्म प्रमाणात आढळून येतात, जसे की ओटीपोटात सौम्य वेदना, दाब जाणवणे, सूज येणे किंवा थोडेसे पोट फुगणे. यांसारखीच लक्षणे ही पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस किंवा अपचन यांसारख्या इतर परिस्थितींमध्येही दिसून येत असल्याने अचूक निदानास विलंब होतो. महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि मासिक पाळीतील वेदना, पोट फुगणे किंवा पाठदुखीचा त्रास असं समजून त्यावर उपचार केले जात नाहीत. अनेकदा हर्निया महिलांमध्ये स्पष्ट दिसून येत नाहीत. अनेक महिला वेदनांची तीव्रता वाढेपर्यंत किंवा सतत वेदन होईपर्यंत उपचाराकरिता जाणे टाळतात.

मासिक पाळी किंवा पचन समस्या समजून बऱ्याचदा हर्नियाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे उपचारांना विलंब होतो आणि गुंतागुंत निर्माण होते. महिलावर्ग अनेकदा सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात व या मासिक पाळीच्या वेदना, पोटफुगी किंवा पाठदुखी असे समजून त्यावर वेळीच उपचार केले जात नाहीत. परिणामी या महिलांमध्ये हर्नियाच्या निदानास विलंब होतो आणि त्यावर वेळीच उपचार केले जात नाहीत. यामुळे भविष्यातील गुंतागुंत वाढू शकते. हे लक्षात असू द्या की, पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही हर्नियाची समस्या उद्भवते. त्यावर वेळेवर उपचार करणे गरजेचे असते.

महिलांमध्ये फेमोरल आणि नाभीसंबंधी हर्निया सामान्यतः आढळून येते. फेमोरल हर्निया हे मांडीजवळ दिसतात आणि विशेषतः धोकादायक असतात, तर नाभीसंबंधी हर्निया हे नाभीजवळ होतात. याच्या कारणांमध्ये गर्भधारणा, लठ्ठपणा, वारंवार खोकला, बद्धकोष्ठता किंवा जास्त वजन उचलणे यांचा समावेश आहे, ज्यामुळे पोटावरील दाब वाढतो आणि स्नायू कमकुवत होतात.

महिला अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष का करतात?

पुरुषांप्रमाणे, महिलांमध्ये हर्नियाची लक्षणे बहुतेकदा सूक्ष्म प्रमाणात आढळून येतात, जसे की ओटीपोटात सौम्य वेदना, दाब जाणवणे, सूज येणे किंवा थोडेसे पोट फुगणे. यांसारखीच लक्षणे ही पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस किंवा अपचन यांसारख्या इतर परिस्थितींमध्येही दिसून येत असल्याने अचूक निदानास विलंब होतो. महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि मासिक पाळीतील वेदना, पोट फुगणे किंवा पाठदुखीचा त्रास असं समजून त्यावर उपचार केले जात नाहीत. अनेकदा हर्निया महिलांमध्ये स्पष्ट दिसून येत नाहीत. अनेक महिला वेदनांची तीव्रता वाढेपर्यंत किंवा सतत वेदन होईपर्यंत उपचाराकरिता जाणे टाळतात.

खालील लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे त्वरित जा

बहुतेक हर्नियांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेवर उपचार करा.ऊतींमध्ये अडकलेला हर्निया : यात उदराच्या भित्तींमध्ये ऊती अडकतात. जर यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर, पोटावर दाब येऊन ऊतींना रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो.

हर्नियामुळे ऊतींवर येणारा दाब : यामुळे कायमचे नुकसान होऊ शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील ओढावू शकतो. जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील आणि ताप येत असेल किंवा हर्नियाचा रंग गडद, लाल किंवा जांभळा होत असेल तर तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्या. अशावेळी तुम्हाला आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागू शकते.जर हर्निया मोठा होत असेल किंवा यामुळे वेदना आणि अस्वस्थता निर्माण होत असेल.

उपचार काय आहेत?

शस्त्रक्रिया हा हर्नियासाठी सर्वात प्रभावी उपचार आहे आणि हल्ली प्रगत लॅपरोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया सोपी व सहज उपलब्ध आहे. आणि मोठ्या प्रमाणात वापरली जातात, ज्यामुळे बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि गुंतागुंतदेखील कमी होते. हर्नियाची शस्त्रक्रिया ओपन किंवा लॅपरोस्कोपिक पद्धती वापरून करता येते. ओपन सर्जरीमध्ये, हर्नियावर एक कट केला जातो, तो मागे ढकलला जातो किंवा काढून टाकला जातो आणि नंतर स्नायूंना टाके घालून बंद केला जातो, पुनरावृत्ती टाळण्यासाठी अतिरिक्त आधारासाठी अनेकदा जाळी ठेवली जाते. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये, लहान कट केले जातात आणि ओटीपोटातून उपकरणांसह कॅमेरा घातला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचं ओपन सर्जरीच्या तुलनेत जलद बरे होता येते. बहुतांश रुग्ण हे एका आठवड्यात सामान्य क्रिया करू लागतात. शस्त्रक्रियेची निवड हर्नियाच्या आकारावर, स्थानावर आणि रुग्णाच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असते.

वेळीच निदान, नियमित शारीरिक तपासणी आणि सतत ओटीपोटातील वेदना किंवा ओटीपोटासंबंधीत त्रासाकडे दुर्लक्ष न करण्यावर भर दिला जातो. महिलांनी अस्पष्ट वेदनांच्या लक्षणांबद्दल बोलले पाहिजे. उभे राहणे किंवा खोकल्याने अस्वस्थता वाढल्यास हर्निया तपासणी करून घ्यावी. वेळेवर उपचार केल्यास केवळ गुंतागुंत टाळता येत नाही तर जीवनाची गुणवत्तादेखील सुधारता येते.