सुरेश वांदिले

औद्योगिक विषयात महिलांनी प्रगती करावी, नवनवीन संधी मिळवाव्या यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून मुलींसाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी दिली जाते. या संस्थात उमेदवारी करणेसुद्धा विद्यार्थिनींसाठी अतिशय उपयोगाचे ठरते. अनुभव तर मिळतोच पण त्याचबरोबर विद्यावेतनसुद्धा मिळते. म्हणजे प्रशिक्षण आणि उत्पन्न अशा दोन्ही संधी मिळतात. अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींसाठी याचा विशेष उपयोग होतो.

शिकावू उमेदवारी योजना

आपल्या राज्यातील आयटीआयचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आवश्यक मूलभूत प्रशिक्षण आयटीआयमध्ये दिल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष कारखाना/उद्योग/व्यवसाय यामध्ये उपयोगात आणली जाणारी यंत्रसामग्री आणि उपकरणे व तंत्र याचे परिपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी ही योजना राबवली जाते. यासाठी एक लाखाहून अधिक जागा राज्यातील ११ हजाराच्या आसपास औद्योगिक आस्थापनांमध्ये उपलब्धता करुन दिल्या जातात.

आयटीआय मधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ही संख्या अधिक असल्याने प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींस या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थिनींस केंद्र शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन दिले जाते.

आणखी वाचा : मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण

अशी आहेत केंद्रे

ठाणे- शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, कोपरी कॉलनी पूर्व ठाणे (अभ्यासक्रम- बेसिक कॉस्मेटॉलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेंटल लेबॉरेटरी इक्विपमेंट टेक्निशिअन, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फॅशन डिझायनिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स, इंटेरिअर डिझायनिंग ॲण्ड डेकोरेशन, सेक्रेटरीयल प्रॅक्टिस – इंग्रजी, सिविंग टेक्नॉलॉजी, टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स),

मुंबई – ३७४ वीर सावरकर मार्ग, दादर- पश्चिम (अभ्यासक्रम- सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस, पेंटर, इंटेरिअर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, फॅशन डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, बेसिक कॉस्मेटॉलॉजी),

अमरावती – मोर्शी रोड इरविन चौक, (अभ्यासक्रम बेसिक कॉस्मेटॉलॉजी , कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फ्रुट ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, सिविंग टेक्नॉलॉजी, ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल, मल्टिमीडिया ॲनिमेशन ॲण्ड स्पेशल इफेक्ट्स, इंटेरिअर डेकोरेटर ॲण्ड डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, सर्फेस ऑर्नामेंटेशन टेक्निक्स, क्रॉफ्ट्समन फूड प्रॉडक्शन, बेकर ॲण्ड कन्फेक्शनर, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स,

पुणे – परिहार चौक, औंध , तालुका – हवेली (अभ्यासक्रम – (अ) कालावधी एक वर्ष- ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, फ्रूट ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसर, कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग. नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क – राष्ट्रीय कौशल्य अर्हता रचना (एनएसक्यूएफ) नुसार या अभ्यासक्रमांसाठी कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गतची पातळी चार ठरविण्यात आली आहे. (ब) कालावधी- दोन वर्षे- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स. एनएसक्यूएफ पातळी –

अकोला – मनकर्णा प्लॉट शिवाजी कॉलेज जुने आकोट स्टॅड,
नागपूर – मालवीय रोड सीताबर्डी,
चंद्रपूर-सिव्हिल लाइन्स, जुन्या वरोडा नाक्याजळ,
भंडारा – नवीन टाकळी, वर्ठी रोर्ड,
औरंगाबाद – भडकल दरवाज्याजवळ,
बीड – नगर रोड,
लातूर – बार्शी रोड,
रत्नागिरी- नाचणे रोड रत्नागिरी,
सोलापूर – 156/ए, रेल्वे लाइन्स, डफरिन चौक,
नाशिक – जुना मुंबई-आग्रा रोड त्र्यंबक नाका, आदिवासी विकास भवनजवळ,
जळगाव – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, जिल्हा उद्योग केंद्रा जवळ,
पिंपरी चिंचवड महापालिका आयटीआय – कासारवाडी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी गुरव रोड, कासारवाडी पुणे,
सगुणामाता मुलींचे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – मुधोजी उच्च माध्यमिक शाळेच्या विरुध्द दिशेला, रविवार पेठ, फलटण तालुका-जिल्हा सातारा,
भारती विद्यापीठाचे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – कडगाव कराड – विटा रोड, जिल्हा सांगली.
अहमदनगर – मुलींसाठी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर</p>

आणखी वाचा : चांगुलपणाला कुठं नाव असतं?

अभ्यासक्रमातील घटक

आयटीआय अभ्यासक्रमातील विषय घटक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट कोलकता यांनी निर्धारित केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद (नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग) चे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट) दिले जाते. या प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा मान्यता दिली जाते. आयटीआयमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर इच्छूक विद्यार्थिनींना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो.

त्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण करणे, तसेच त्यासाठीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा उपयोग व्यवसाय अथवा नोकरीसाठी निश्चितच होऊ शकतो. या प्रमाणपत्राच्या जोरावर पुढे उच्चशिक्षण घेण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे हा अभ्यासक्रम महिला अथवा मुलींसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. कमीत कमी वेळात जास्तीतजास्त संधी आणि पुढे उत्पन्नाची साधने मिळवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी या अभ्यासक्रमांचा नक्कीच उपयोग होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संस्थांविषयी अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर तसेच पत्त्यावर मिळेल.
संपर्क – संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक १००३६, मुंबई – १,
दूरध्वनी-०२२-२२६२०६०३,
ईमेल-itiadmission@dvet.gov.in
संकेतस्थळ – dvet.gov.in