‘काम डाउन’, ‘पिपल यू नो’, ‘व्हू सेस’, ‘लव्ह ओन’, ‘सिंगल सून’, ‘बॅक टू यू’, ‘स्लो डाउन’, ‘गॉड फॉर यू’, ‘सेम ओल्ड लव्ह’, ‘लूक अॅट हर नाउ’ असे अनेक सुपरहिट गाणी देणारी जगप्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज ( Selena Gomez ) वयाच्या ३२व्या वर्षीय अमेरिकेतील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये सामील झाली आहे. तिच्याकडे एकूण १० हजार कोटींची संपत्ती आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरपेक्षा १०० पट अधिक सेलेना आता कमावतं आहे. अशी ही अमेरिकेची तरुण अब्जाधीश सेलेना नेमकी कशी पैसे कमवते? जाणून घेऊयात…
सेलेना गोमेज ( Selena Gomez ) फक्त गायिक नसून ती उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि व्यावसायिका देखील आहे. या चारही क्षेत्रात सेलेनाने स्वःबळावर वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सेलेनाचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरतं आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सने दिलेल्या माहितानुसार, सेलेनाकडे एकूण १.३ बिलियन डॉलरची म्हणजे १० हजार कोटींची संपत्ती आहे. सेलेना ही संगीत, अभिनय आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रातून बक्कळ पैसा कमवते. पण त्यात सर्वात मोठा हिस्सा ५ वर्षांपासून म्हणजेच २०१९ला सुरू केलेली मेकअप कंपनी ‘रेअर ब्यूटी’ ब्रँडचा आहे. याच ब्रँडला मिळालेल्या यशामुळे ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सवर टेलर स्विफ्ट आणि रिहानासारख्या कमी वयाच्या प्रसिद्ध श्रीमंत लोकांपैकी सेलेना एक ठरली आहे.
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी तिसरी व्यक्ती
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलेना तिसरी सेलिब्रिटी आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवरूनही ती जबरदस्त कमाई करते. फुटबॉल आयकॉन ख्रिस्तियानो रोनाल्डोचे ६३९ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि लिओनेल मेस्सीचे ५०५ मिलियन फॉलोअर्स इन्स्टाग्रावर आहेत. तर सेलेनाचे ४२४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
या जगप्रसिद्ध गायिकेच्या करिअरची सुरुवात ही एखाद्या पुस्तकातील कथेप्रमाणे आहे. ‘डिज्नी’ वाहिनीवरील ‘द विजार्ड्स ऑफ वेवरली प्लेस’ या शोमधून सेलेनाच्या करिअरची सुरुवात झाली होती. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन शो आणि चित्रपट केले. तिने आता बंद झालेला मॅक्स कुकिंग शो ‘सेलेना + शेफ’ स्वःत बनवला होता. तर ‘ओनली मर्डर्स इन द बिल्डिंग’मध्ये सेलेनाने ( Selena Gomez ) कॉमेडी आयकॉन मार्टिन शॉर्ट आणि स्टिव्ह मार्टिनबरोबर काम केलं होतं. या सुपरस्टारने लुई ‘वुइटन’, ‘कोच’ आणि ‘प्यूमा’सारख्या कंपनीबरोबर एंडोर्समेंट डीलच्या माध्यमातून कोट्यावधी डॉलर्स कमावले आहेत. सेलेनाच्या संपत्तीत मोठा हिस्सा असलेली तिची कंपनी ‘रेअर ब्यूट’ने सुरू झाल्यानंतर वर्षभरात तब्बल ४०० मिलियनची विक्री केली होती.
सेलेना कधीच होऊ शकत नाही ‘आई’!
अलीकडेच सेलेनाने ( Selena Gomez ) वैयक्तिक जीवनातील एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला होता. गायिकेने ‘व्हॅनिटी फेअर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी याआधी असं काही बोलली नाहीये. पण दुर्दैवाने मी कधीच मुलांना जन्म देऊ शकत नाही. मला काही आजार आहेत; जे मला आणि माझ्या मुलांना धोकादायक आहेत. हे सत्य समजल्यानंतर मला खूप मोठा धक्काच बसला होता. या धक्क्यातून मी स्वतःला सावरू शकत नव्हते. पण मी आई होण्याच्या दुसऱ्या पद्धतीचा विचार करणार आहे. सरोगसी किंवा अनाथ मुलं घेण्याचा विचार करू शकते.” माहितीनुसार सेलेना गोमेजची आई मँडी टीफी या अनाथ होत्या.
…म्हणून सेलेनाला करावं लागलं किडनी प्रत्यारोपण
दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून सेलेना ‘ल्यूपस’ नावाच्या आजाराशी लढत आहे. या आजाराबाबत ती स्वतः खुलेपणाने बोलते. २०१७मध्ये ‘प्लूपस’ या आजारामुळे गायिकेचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं. एवढं सगळं सहन करत सेलेना ( Selena Gomez ) वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी अमेरिकेतील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक ठरली आहे.