प्रशासकीय सेवा हे पैसे कमविण्याचे साधन नाही, तर सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी या क्षेत्रात तरुणांनी आले पाहिजे, असे मत ‘स्कोलियासीस’ या पाठीच्या कण्याशी संबंधित आजारांमुळे आलेल्या अपंगत्वावर मात करीत आयएएसच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या इरा सिंघाल यांनी व्यक्त केले.
गित्तेज आयएएस करीअर अॅकॅडमीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इरा सिंघाल यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करीत आयएएसची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या वाटचालीविषयीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही मन काही रमले नाही. त्यामुळे आयएएसच्या परीक्षेची तयारी सुरू केली. समाजात चांगले बदल घडविण्यासाठी ही परीक्षा दिल्याचे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये नोकरी सोडल्यानंतर या परीक्षेची तयारी सुरू केली. पाठीच्या कणाचा आजार असला तरी कुढत बसणे मला मान्य नव्हते. परिस्थितीचा स्वीकार केला आणि त्यावर मात करण्याचे ठरविले. या साठी मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांनी बळ दिले. परीक्षा पद्धती आणि शिक्षण पद्धतीला दोष देण्यापेक्षा स्वत:मधील उणिवांचा शोध घ्या आणि त्यावर मात करायला शिका, असेही त्या म्हणाल्या.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास शिऊरकर, अमरावतीच्या जिल्हाधिकारी किरण गित्ते, दिल्लीचे डीसीपी व २०१२ मधील टॉपर हरेश्वर स्वामी, २०१४ मधील टॉपर आयएएस गौरव राय, उषा गित्ते यांची उपस्थिती होती.

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत