शास्त्री-मुंडे समर्थकांत आरोप प्रत्यारोप

महंत नामदेव शास्त्री यांनी या वर्षीही भगवानगडावर राजकीय दसरा मेळाव्याला परवानगी देऊ नये, अशी भूमिका कायम ठेवली आहे. तर पंकजा मुंडे यांनी मेळाव्याबाबत आपण द्विधा मन:स्थितीत असल्याचे सांगत मौन बाळगले असले तरी मुंडे समर्थकांनी मेळावा गडावरच झाला पाहिजे, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर वातावरणनिर्मिती केली आहे. महंत नामदेव शास्त्री यांची एक ध्वनिफीत बाहेर आल्यानंतर मुंडे समर्थकांनीही महंतांनी गडाचे पावित्र्य राखावे, असा सल्ला देणाऱ्या ध्वनिफिती समाजमाध्यमातून पसरवल्या आहेत. तर एका व्यक्तीने महंतांची बदनामी होईल असे छायाचित्र प्रसारित केले असून माध्यमातून महंत विरुद्ध मुंडे समर्थकांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यातून महंतांची बदनामी केल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे या वर्षीच्या दसरा मेळाव्यावरूनही वादंग निर्माण झाला आहे. मागील महिनाभरापासून दसरा मेळाव्यावरून वाद वाढला आहे. महंत शास्त्री यांनी नगर जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन दसऱ्याला या वर्षीही गडावर कोणत्याही मेळाव्याला परवानगी देऊ नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे बजावले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे समर्थक जिल्हा परिषद अध्यक्षा सविता विजय गोल्हार यांनी गडाच्या पायथ्याला सात एकर जमीनही खरेदी केलेली आहे. या जागेवर मेळावा घेण्याची तयारीही समर्थकांनी केली आहे. दरम्यान, पाथर्डीत मुंडे समर्थकांनी महंत शास्त्रींवर शेलक्या शब्दांत आरोप करत मेळावा गडावरच घेण्याचा निर्धार केल्याने तणाव वाढला आहे. पोलिसांनी गडावर बंदोबस्त लावला असून, शुक्रवारी मुंडे समर्थकांनी गडावर संत भगवानबाबांच्या समाधीसमोर मेळाव्याला परवानगी द्या, यासाठी उपोषण करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गडाच्या परिसरातील लोक मोठय़ा संख्येने महंतांच्या समर्थनार्थ गडावर दाखल झाले. उपोषणकत्रे आलेच नसल्याने वाद टळला. तर दोन दिवसांपूर्वी महंत नामदेव शास्त्री यांची एक ध्वनिफीत प्रसारित झाली असून, त्यात शास्त्रींनी गडावरील वाद भाषणाचा नाही तर साडेतीनशे एकर जमिनीचा आहे, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत गडाची स्थावर मालमत्ता कोणालाही हडप करू देणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

यावर मुंडे समर्थकांनी आक्षेप नोंदवत महंतांनी गडाचे पावित्र्य राखावे असे सल्ले देत महंतांविरुद्धही ध्वनिफीत प्रसारित केली आहे. त्यात एका व्यक्तीने महंत यांच्या हातात मद्यासारखे दिसणारे एक ग्लास असलेले छायाचित्र आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. या बाबत अशोक लक्ष्मण बांगर (रा. वाघिरा, ता.पाटोदा) यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी सप्ताहानिमित्त महंत गावात आपल्या घरी आले होते. दुधाचा चहा पीत नसल्याने त्यांना काचेच्या ग्लासामध्ये कोरा चहा देण्यात आला होता. त्या वेळी काही भक्तांनी छायाचित्र काढले. त्याला छेडछाड करून बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी भाऊसाहेब कुटे (रा. सोनगिरी, ता.भूम, जि. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजमाध्यमातून महंत शास्त्री व मुंडे समर्थकांत अत्यंत खालच्या पातळीवर संघर्ष सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत दसरा मेळाव्याबाबत आपण द्विधा मन:स्थितीत असून, लाखो लोक मेळाव्याच्या परंपरेची मागणी करत आहेत. महंत या मागणीच्या विरोधात आहेत, त्यामुळे आपण द्विधा मन:स्थितीत असल्याने योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगून या वादावर मौन बाळगले आहे.