आम आदमी पार्टीचे (आप) आमदार आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली असून, त्याचा फटका महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पक्षाच्या दिल्लीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांना प्रस्थापितांविरोधातील वातावरणाची माहिती देण्यात आली. पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे ही दरी सांधण्याची गरज असून कार्यकर्त्यांचा योग्य मान राखला पाहिजे, असे एका कार्यकर्त्यांने सांगितले.
पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्यात ठरावीक कालावधीनंतर बैठक घेण्यात यावी, कार्यकर्त्यांनी प्रस्तावित केलेली विकासकामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.