सवलतीच्या दरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता वर्षाला सवलतीचे सहा ऐवजी नऊ सिलेंडर मिळणार आहेत. या बातमीने सामान्य माणसाला दिलासा मिळाला असला तरी डिझेलच्या किंमतींचे सर्वाधिकार आता कंपन्यांना देण्याचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आल्यामुळे एकाच वेळा दिलासा आणि झटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र यावर्षी मार्चपर्यंत सहाच सिलेंडर मिळणार असून या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०१३ पासून करण्यात येईल. आता सिंलेंडर्सवर ४५०.९० ची सबसिडी मिळणार असून ३ सबसिडीच्या सिलेंडर्सवर १४७१ रूपयांचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलच्या किंमतींचे सर्वाधिकार कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बाजारानुसार डिझेलचे दर ठरणार आहेत.