मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेसबरोबर युती ठेवायची की नाही, याचा गंभीर फेरविचार आम्हाला करावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसशी आमची युती झाली होती. काँग्रेसने आम्हाला नऊ जागा दिल्या. मात्र त्यातील पाच जागांवर काँग्रेसचेही उमेदवार उभे राहिले आणि उरलेल्या जागांवर काँग्रेस बंडखोर उभे राहिले. याला आघाडीचा धर्म आणि साहचर्य म्हणत नाहीत. युती करायची तर पारदर्शकपणा आणि प्रामाणिकपणा अनिवार्य आहे. त्यांची वृत्ती अशीच राहिली तर पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकांत आघाडी करायची की नाही याचा गंभीरपणे विचार करावाच लागेल.
महिलांवरील अत्याचारांविरोधातील कायदे कठोर करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



















पवार्सब धमक्या देणे बंद करा,त्याचे आता हसे होऊ लागले आहे,एकदा तरी धमकी खरी करून दाखवाच.आता कॉंग्रेस पोकळ धमक्यांना भिक घालत नाही हे सिद्ध झाले आहे.शेवटी दादा पुता केल्यावर तुम्ही माघार घेता म्हणून तुमचा पात कमी होते आणि बदनामी होते.तुम्ही भरपूर चालक आणि समझदार आहात,तुम्हाला आम्ही काय जास्त सांगणार.
बातमीचे शीर्षक ‘काँग्रेस-राष्ट्रवादी युती धोक्यात – इति पुन्हा एकदा शरद पवार’ असे पाहिजे होते. लोकांना मुर्ख बनवणे थांबवा आता. कॉंग्रेस शिवाय राष्ट्रवादी स्वबळावर सत्तेवर येउच शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. ज्या मुद्द्यावरून तुम्ही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्याच मुद्द्याला तुम्ही काळिमा फसला हे जनता विसरली नाही, तेंव्हा या वल्गना आता बंद करा……
खालील वाक्ये जणू पवार साहेबांसाठीच मराठीत आलेली असावीत
१. या सगळ्या गप्पा आहेत
२. यांचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे असतात
३. त्यांची काहीतरी आतमध्ये “deal ” असणार.
४. काहीतरी हवा निर्माण करायची त्यांना आवड आहे
५. दिशाभूल करणे हा त्यांचा cchand आहे.
६. लोकांन्ना येडे बनवणे
अशी अनेक वाक्ये असावीत.