हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेलूम या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंना  निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी केली. विद्यापीठाच्या कॅप्मसमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. रोहितच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असून विद्यापीठाच्या कुलगुरूंची त्वरित हकालपट्टी केली गेली पाहिजे. यासोबतच विद्यार्थ्यांसोबत धार्मिक राजकारण केल्याप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही देशारोहितच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असून विद्यापीठाच्या कुलगुरूंची त्वरित हकालपट्टी केली गेली पाहिजे.ची जाहीर माफी मागयला हवी, असे केजरीवाल म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री बंडारू यांच्यावरही केजरीवाल यांनी जोरदार टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या हुशार विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, ही संपूर्ण समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, रोहितच्या आत्महत्येनंतर हैदराबादसह विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. रोहित आणि त्याच्या चार सहकारी विद्यार्थ्यांचे अभाविपच्या नेत्याला मारहाण केल्याचा आरोपाखाली निलंबन करण्यात आले होते. यानंतर  रोहित वेमुला याने विद्यापीठाच्या संकुलातील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती.