कृष्णद्रव्याचे अस्तित्व दाखवणारे संदेश देवयानी दीर्घिकेतून मिळाले आहेत. कृष्णद्रव्य अजून सापडलेले नसून नासाच्या मते आता मिळालेले संदेश कृष्णद्रव्याचे अस्तित्व दाखवणारे आहेत. आपले विश्व कृष्णद्रव्याने भरलेले आहे असे मानले जाते. नासाच्या फर्मी गॅमा किरण दुर्बिणीने जसे संदेश आपल्या आकाशगंगेतून २०१४ मध्ये टिपले होते तसेच संदेश आता देवयानी दीर्घिकेतून टिपले गेले आहेत. गॅमा किरण हे उच्च ऊर्जा असलेले किरण असतात ते विश्वातील सर्वात जास्त ऊर्जाधारी घटनांत बाहेर सोडले जातात. आपल्या आकाशगंगेत अशा घटना नेहमीच्या आहेत कारण प्रकाशाच्या वेगाने जाणारे किरण म्हणजे वैश्विक किरण हे आंतरतारकीय वायू व ताऱ्यांच्या प्रकाशाशी अभिक्रिया करतात त्यावेळी गॅमा किरणांची निर्मिती होत असते.  फर्मी दुर्बिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार देवयानी दीर्घिकेतील गॅमा किरण एम ३१ नावाने ओळखले जातात व ते सगळीकडे पसरलेले नसून दीर्घिकेच्या केंद्रस्थानी आहेत. त्याच्या असमान वितरणाचे स्पष्टीकरण करण्यात आले असून त्याचे एक कारण कृष्णद्रव्याचा समावेश हे असल्याचे सांगण्यात आले. आकाशगंगा व इतर दीर्घिकांच्या मध्य भागात कृष्णद्रव्य एकवटलेले असावे त्यामुळे हे संदेश या स्वरूपात दिसत असावेत, असे नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्च अँड रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अँड प्लॅनेटोलॉजी या फ्रान्सच्या संस्थेतील संशोधक पियरिक मार्टिन यांनी म्हटले आहे. एम ३१ हे देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा यांना समजून घेण्याचे साधन आहे व त्यांच्या केंद्रस्थानी पल्सार असावेत. ते न्यूट्रॉन तारे हे सूर्यापेक्षा दुप्पट वस्तुमानाचे असावेत. न्यूट्रॉन ताऱ्यातील एक चमचाभर वस्तुमान पृथ्वीवर अब्जावधी टन वजनाचे भरते. काही पल्सार हे गॅमा किरणातून जास्त ऊर्जा बाहेर टाकतात. एम ३१ हे २५ लाख प्रकाशवर्षे दूर असून विभक्त स्वरूपात हे पल्सार दिसणे अवघड आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

 

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…