भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केरळमधील पुनामाडा येथील जलक्रीडा केंद्रामध्ये प्रशिक्षण शिबिरादरम्यान शारीरिक आणि मानसिक छळवणुकीमुळे चार महिला खेळाडूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यापैकी एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, मृत मुलीच्या नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत आणि दोषींना त्वरीत शासन करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही व राष्ट्रीय महामार्ग रोखून धरू, अशी भूमिका मृत मुलीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
केरळमधील ‘साई’च्या जलक्रीडा केंद्रात  प्रशिक्षण शिबिरादरम्यान वरिष्ठांकडून छळ करण्यात आल्यामुळे या मुलींनी विषारी फळे खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता येथील वसतीगृहाच्या उपहारगृहात या मुलींनी ‘ओथालांगा ‘या स्थानिक फळाचे सेवन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर गुरूवारी सकाळी ७ वाजता या मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
दरम्यान, मुली राहत असलेल्या वसतीगृहाच्या वॉर्डनने मानसिक आणि शारीरिक छळवणुकीचे सर्व आरोप नाकारले असून, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. 
 धरू, अशी भूमिका मृत मुलीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.