प्रणब मुखर्जी यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी आपण मुंबई दौऱ्यावर असताना ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकांत केला आहे.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच पुढाकाराने आपण बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. ठाकरे यांनी भेटण्याची इच्छा आपण व्यक्त केली आणि पवार यांनी त्वरित होकर दिला. त्यानुसार ठाकरे यांची भेट घेतली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. तेव्हा मराठा टायगरचा बंगाल टायगरला पाठिंबा, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, अशी आठवणही मुखर्जी यांनी पुस्तकांत लिहिली आहे. मुंबईचा दौरा आटोपून दिल्लीला परतलो, तेव्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांनी आपल्याशी चर्चा केली. ठाकरे यांची भेट घेतल्याने सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे नाराज असल्याचे व्यास यांनी आपल्याला सांगितले. मात्र त्यानंतर आपण त्यांची समजूत काढली, असे मुखर्जी यांनी ‘द कोअलिशन इयर्स’ या पुस्तकांत म्हटले आहे.