रघुराम राजन यांच्यावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचे सांगत मोदींनी फटकारल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रसिद्धीच माझ्या मागे धावत असल्याचा दावा केला. माझ्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांचे जथ्थे बातम्या मिळविण्यासाठी उभे असतात. त्यामुळे मला आपसूकच प्रसिद्धी मिळते, असे स्वामी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. मी सदैव मोदींसारख्या कणखर पाठीशी उभा आहे. मात्र, मला भडकवण्यासाठी प्रसारमाध्यमांकडून जाणुनबुजून खोट्या बातम्या पेरल्या जातात. राजकारण्याला प्रसिद्धी अकारण चिकटते, ही माझी नवीन समस्या आहे. आताही माझ्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांचा घोळका उभा आहे. ‘प्रेस्टिट्यूट’कडून दररोज खोट्यानाट्या बातम्या दिल्या जातात. त्यांना वाटते की, मी संतप्त होऊन काही प्रतिक्रिया देईन. त्यांना अशी आशा आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
डॉ. स्वामी यांच्या वक्तव्यांबद्दल पंतप्रधानांची नाराजी