सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, सोने वापरावर मर्यादा असे अनेक धडाकेबाज व खळबळजनक निर्णय घेऊन विरोधकांना पळता भुई थोडे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉलिवूड ललना सनी लिओनीने मागे टाकले आहे. याहू इंडियाने केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये सनी लिओनीने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूड स्टार सलमान खानला मागे टाकत नंबर एकचे स्थान पटकावले आहे.
मागील पाच वर्षांपासून या तिन्ही भारतीयांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर सलमान खानला चौथे स्थान मिळाले आहे. दरवर्षी ही वेबसाईट भारतीय लोक, कार्यक्रम आणि कथानकाच्या आधारावर वर्षभरातील आकडेवारी जारी करण्यात करते.

टॉप मोस्ट सर्च पुरूष सेलिब्रेटी यादीत सलमान खान टॉपला आहे. तर त्याच्यासोबत सुलतान या चित्रपटात काम करणारी त्याची सहअभिनेत्री अनुष्का शर्मा ही टॉप मोस्ट सर्च महिला सेलिब्रेटी यादीत दहाव्या स्थानी आहे. महिलांच्या सेलिब्रेटी यादीत अलिया भट्टला आपले स्थान कायम राखण्यात यश आलेले नाही.
बीबीसीने नुकताच जाहीर केलेल्या १०० प्रतिभावान महिलांच्या यादीतही सनी लिओनीने स्थान मिळवले होते. सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ती २०११ मध्ये बिग बॉस या विवादास्पद रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडची दारं उघडी करण्यात आली. बिग बॉसनंतर तिने ‘जिस्म २’, ‘जॅकपॉट’ आणि ‘एक पहेली लीला’ यांसारख्या सिनेमात काम केले.
दरम्यान, सनी लिओनीचे जसे जगभरात चाहते आहेत. त्यातला एक म्हणजे ओसामा बिन लादेन हाही होता. सनी लिओनीच्या आयुष्यावर एक लघुपट बनत आहे. या लघुपटाचे नाव आले ‘मोस्टली सनी’. दिग्दर्शक दिलीप मेहता सध्या या लघुपटावर काम करत आहेत. या लघुपटात सनीच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटनांचा उलगडा होणार आहे. नुकताच ‘मोस्टली सनी’ या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तिच्या या लघुपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजून उत्सुकता वाढली आहे. सनी लिओनीच्या या लघुपटात असा खुलासा करण्यात आला आहे की कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन हा तिचा चाहता होता. पाकिस्तान इथल्या अबोटाबाद येथे जेव्हा अमेरिकी सैन्याने ओसामाला ठार मारले होते, तेव्हा ओसामाजवळ सनी लिओनीच्या सिनेमांच्या व्हिडिओ सीडी असण्याची गोष्ट पुढे आली होती.