लिओनेल मेस्सीला दुखापतीमुळे तीन आठवडय़ांच्या सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागले आहे. त्यामुळे त्याला विश्वचषक पात्रता स्पध्रेतील पेरू आणि पेराग्वे यांच्याविरुद्धच्या लढतींमध्ये अर्जेटिना संघाने प्रतिनिधित्व करता येणार नाही. मेस्सीच्या अनुपस्थितीमुळे अर्जेटिनाचे प्रशिक्षक एडगाडरे बाऊझा चांगलेच संतापले असून त्यांनी बार्सिलोना क्लबलाच जबाबदार धरले आहे.

ते म्हणाले, ‘‘मेस्सीचा काळजी घ्या, असा संदेश बार्सिलोना क्लब सतत आम्हाला पाठवत असतो, परंतु त्यांना त्याची काळजी घेता आली नाही. त्याला प्रत्येक सामन्यात खेळवण्याचा त्यांनी अट्टहास धरला.  त्याच्याशिवाय खेळणे  संघासाठी आव्हानात्मक आहे.’’