बार्सिलोनाची अ‍ॅथलेटिक बिलबाओवर मात

इव्हान रॅकिटिकच्या हेडरच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक बिलबाओविरुद्ध १-० अशी विजयी सलामी दिली. हंगामातील पहिली लढत जिंकण्याचा विक्रम बार्सिलोनाने यंदाही कायम राखला.

२१व्या मिनिटाला हेडरद्वारे शानदार गोल करीत बार्सिलोनाचे खाते उघडले. बार्सिलोनाचे आधारस्तंभ असलेले लिओनेल मेस्सी आणि ल्युइस सुआरेझ यांना सूर गवसला नाही. या गोष्टीचा फायदा उठवत अ‍ॅथलेटिकच्या बेनट एक्सबेआरियाने फ्री किकद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेला.

या विजयासह बार्सिलोनाने रिअल माद्रिदसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. या दोन्ही संघांनी दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रिदची गुणतालिकेत घसरण झाली आहे.

यापूर्वीच्या लढतीत बार्सिलोनाने रिअल बेटिसचा ६-२ असा धुव्वा उडवला होता. तीच लय कायम राखत बार्सिलोनाने विजयाची नोंद केली.