भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेतील खासदारकीच्या नेमणुकीवर आक्षेप घेणारी जनहीत याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने आज(बुधवार) फेटाळून लावली आहे. घटनेच्या ८० व्या कलमांतर्गत राज्यसभेचा सदस्य होण्याचे कोणतेही निकष सचिनने पुर्ण न करता त्याला राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली त्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सरकारने दिल्ली उच्चन्यायालयात आपली बाजू मांडत सचिनच्या नियुक्तीचे समर्थन केले. यावर दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. मुरुगेसेन आणि न्यायाधीश राजीव सहाय यांच्या खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली. ही याचिका दिल्लीतील माजी आमदार रामगोपाल सिंग सिसोदिया यांनी दाखल केली होती