टेनिसचे चाहते असलेल्या महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या आवडीला व्यावसायिक रूप दिले आहे. महेश भूपतीच्या कल्पनेतून साकारलेल्या टेनिस लीगमधील सिंगापूर संघाची काही टक्के मालकी गावस्कर यांनी घेतली. ‘द डेली टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार गावस्कर टेनिस लीगमधील सिंगापूर संघाच्या सहमालकांपैकी एक आहेत, अशी माहिती ग़्रासकोर्टवरील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेपूर्वी सिंगापूर संघाने दिली.  ‘‘मी टेनिसचा मोठा चाहता आहे. महेश भूपती आणि लिएण्डर पेस जोडीचा खेळ मी गेली अनेक वर्षे पाहत आलो आहे. त्यामुळे टेनिस लीगशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.