रेल्वेकडून खेळणाऱ्या मुंबईच्या युवराज वाल्मीकीने (३०व्या, ३५व्या व ५४व्या मि.) शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. त्यामुळेच त्यांच्या संघाने गतविजेत्या एअर इंडियाला ६-४ असे हरवले आणि वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तसेच सुनील यादवच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर उत्तर प्रदेशाने गंगापूर ओडिशावर ३-० असा विजय मिळविला.