पहिल्याच सामन्यात पराभव पदरी पडल्यावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ हताश झाला नसून आपल्या विजयी अभियानासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे, तर दुसरीकडे पहिला सामना जिंकल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दिल्लीचा कर्णधार केव्हिन पीटरसनच्या सहभागाबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह असल्याने संघात थोडेसे दडपण असेल. पण जे.पी. डय़ुमिनी आणि रॉस टेलर चांगल्या फॉर्मात असले तरी दिनेश कार्तिक, मुरली विजय यांना लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.
कोलकात्यासाठी जॅक कॅलिस हा हुकमी एक्का आहे, तर सुनील नरिन आणि मॉर्ने मॉर्केल चांगली गोलंदाज करत आहेत. पण कर्णधार गौतम गंभीर आणि युसूफ पठाण यांच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा असतील.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नरीन, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, शकिब-अल-हसन, उमेश यादव, विनय कुमार, मॉर्ने मॉर्केल, पीयूष चावला, मनीष पांडे, वीर प्रताप सिंग, ख्रिस लीन, आंद्रे रसेल, एस. एस. मंडल, पॅट कमिन्स, देबब्रता दास, सूर्यकुमार यादव, मनविंदर बिस्ला, रायन टेन डोश्चटे आणि कुलदीप यादव.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : केव्हिन पीटरसन (कर्णधार), दिनेश कार्तिक, मुरली विजय, मोहम्मद शमी, नॅथन कल्टर-निले, क्विंटन डि कॉक, मनोज तिवारी, जयदेव उनाडकट, जे. पी. डय़ुमिनी, राहुल शर्मा, लक्ष्मी रतन शुक्ला, जिमी निशाम, सौरभ तिवारी, रॉस टेलर, केदार जाधव, मयांक अगरवाल, वेन पार्नेल, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, राहुल शुक्ला, एच. एस. शरथ, मिलिंदकुमार, जयंत यादव.