वसई तालुका कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या प्रकाश गायकवाडने योगेश परदेशीचा २५-९, २५-१२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पंकज पवारने पुण्याच्या अनिल मुंढेला २५-१३, १६-२५, २५-० असे हरवून आगेकूच केली. एशियाई विजेत्या संदीप देवरूखकरने ठाण्याच्या विलास दळवीचा २५-१३, २५-११ असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली आहे. गणेश टावरेने एशियाई विजेत्या हिदायत अन्सारीला २५-१२, २५-२० असे नमवले.