डेव्हिस चषकातील परतीच्या एकेरीमध्ये भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने कोरियाच्या याँग क्यू लिमवर विजय मिळवला. सोमदेवच्या या विजयासोबतच भारताने वर्ल्ड प्लेऑ़फ ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.
भारताने डेव्हिस करंडक संघाने मिळविलेली ही ऐतिहासिक कामगिरी आहे. सोमदेवने आज (रविवार) झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात कोरियाच्या याँग-क्यू लीम याचा ६-४, ५-७, ६-३, ६-१ असा पराभव केला. सोमदेवच्या या विजयामुळे भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सेटमध्ये सोमदेवला याँगने जोरदार टक्कर दिली. पण, तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये सोमदवने सहज गुण मिळवीत विजय साजरा केला.
याआधी रोहन बोपण्णा आणि साकेथ मिनेनी यांनी दुहेरीत विजय मिळवत भारताला डेव्हिस चषक आशिया/ओशिनिया ग्रुप १ च्या दुस-या फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध २-१ ने आघाडी मिळवून दिली होती. भारताने मिळवलेल्या विजयानंतर टेनिसपटू सनम सिंगने ट्विटरद्वारे संघाला शुभेच्छा दिल्या. तर बोपण्णानेही विजयाबाबत आनंद व्यक्त केला.