गरोदर स्त्री ही दोन जीवांची माता असते. त्यामुळे तिने स्वतःची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. या जगात येणारा नवा जीव जास्तीत जास्त सुदृढ आणि निरोगी असावा यासाठी गरोदर स्त्रियांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही जपायला हवे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि ठराविक व्यायाम तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास प्रसूती प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. या काळात कोणती आसने केल्यास जास्त चांगले याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. गरोदर स्थितीत कोणतेही आसन करताना शरीराला अकारण ताण पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यातही बैठक स्थितीत करायच्या आसनांची माहिती घेऊया…

भद्रासन

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
World Bank Report Shows No Equal Work Opportunity for Women in Any Country
समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या

१. दोन्ही पायात दोन ते तीन फूट अंतर घेऊन पाय पसरुन बसावे.
२. पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांस जुळवावेत.
३. जुळलेले पाय टाचेकडून शिवणीजवळ आणावेत.
४. दोन्ही हातांनी पायाची बोटे पकडावीत.
५. मांडीचे स्नायू जास्तीत जास्त शिथिल करुन झेपेल तेवढे ताणावेत व सैल सोडावेत.
६. दोन्ही गुडघे जमिनीलगत नेण्याचा प्रयत्न करावा.
७. डोळे मिटून स्थिरता आणि सुखकारकता अनुभवावी.
८. संथ श्वसन करावे. श्वसनाची ५ ते १० आवर्तने होईपर्यंत आसनस्थिती स्थिक ठेवण्याचा प्रयत्न करावा.

हे आसन गर्भधारणेपासून सहाव्या ते सातव्या महिन्यापर्यंत करावे. या आसनात मांड्या व पोटऱ्यांना सुखद ताण येतो. मांड्यांच्या आतील भागातील योनीमार्गाजवळील स्नायूंवरही ताण येतो. यामुळे ताणक्षमता वाढते आणि प्रसूती सुलभ होण्यास मदत होते. प्रसूती पूर्ण झाल्यावर टाके घालून पूर्ववत करतात. हे टाके लवकरात लवकर भरावेत यासाठीही या आसनाचा उपयोग होतो. कालावधीचे बंधन नाही. मात्र गर्भवती स्त्रियांनी आपल्याला जमेल तेवढाच वेळ आसन करावे.

पद्मासन

१. प्रथम दोन्ही पायात दिड ते दोन फूटांचे अंतर घेऊन पाय पसरुन बसावे.
२. उजवा पाय गुडघ्यात वाकवून त्या पायाचा चवडा डाव्या मांडीवर ठेवावा व टाच उजव्या जांघेवर ठेवावी.
३. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करुन ते गुडघ्यांवर ठेवावेत.
४. मनात कोणतेही विचार आणू न देता ताण आलेले स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करावा.
५. डोळे मिटून स्थिरता आणि सुखकारकतेचा अनुभव घ्यावा.
६. अशाचतऱ्हेने दुसऱ्या बाजूने आसन करावे.

हे आसन सोडताना उलट क्रमाने सोडावे. सुरुवातीला कठिण वाटत असले तरीही नित्य सरावाने ते जमते. काही जणींना सातव्या महिन्यानंतर पोट वाढल्याने हे आसन करणे कठिण जाते. अशांनी विनाकारण ताण न देता सहज जमेल तितकेच करावे. ओटीपोटाचे आणि मांड्यांचे स्नायू ताणले गेल्याने कमरेचे सांधे व स्नायूंची कार्यक्षमता वाढते. गर्भवती स्त्रीने या आसनात डोळे मिटून आपल्या गोंडस बाळाला डोळ्यासमोर आणावे.

पर्वतासन

१. जमत असल्यास पद्मासनाची स्थिती घ्यावी.
२. हात कोपरात न दुमडता खांद्याच्या रेषेत समोरच्या बाजूने तळवे एकमेकांना जुळवावेत.
३. सावकाश श्वास घेत डोक्याच्या दिशेने हात वर न्यावेत.
४. आसन स्थिती घेतल्यावर संथ श्वसन करावे.
५. गर्भधारणेपासून साधी मांडी किंवा पद्मासन घालता येते तोपर्यंत हे आसन करावे.

यामध्ये हात, छाती, पाठव पोटाचे स्नायू ताणले जातात. या सर्व अवयवांची कार्यक्षमता गर्भावस्थेत वाढते. या आसनामुळे पाठदुखीसारख्या समस्या कमी होतात. या आसनाच्या नियमित सरावाने श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते. स्तनपानाच्या वेळेस उद्भवणाऱ्या समस्या कमी होतात.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ