औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेच्या ऋषीकेश खैरे आणि सिद्धांत शिरसाट यांची निवड करण्यात आली. यापैकी ऋषीकेश खैरे हे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे तर सिद्धांत शिरसाट हे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे पूत्र आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेचे स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेनेकडून ऋषिकेश खैरे आणि सिद्धांत शिरसाट यांना संधी देण्यात आली.

मुलांच्या राजकीय वाटचालीसाठी वडिलांकडून वजन वापरण्यात आल्यामुळे खासदार आमदार पुत्रांची वर्णी लागल्याचं बोलले जात आहे. ऋषीकेश खैरे हे महापालिकेच्या समर्थनगर प्रभाग क्रमांक ६८ मधून निवडून आलेले आहेत. तर बन्सीलाल नगर प्रभाग क्रमांक १०४ मधून सिद्धांत शिरसाट पालिकेवर निवडून आलेले आहेत.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या आठ जणांमध्ये शिवसेनेच्या पाच, भाजपचा एक आणि एमआयएमच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ऋषीकेश खैरे, सिद्धांत शिरसाट, स्वाती नांगरे, रूपचंद वाघमारे यांची तर भाजपकडून राखी देसरडा आणि शहर विकास आघाडीकडून गजानन बरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एमआयएम’च्या वतीने सय्यद मतीन रशीद, नर्गिज सलिम यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. याशिवाय, शहर विकास आघाडीकडून गजानन बरवाल यांना स्थायी समितीच्या सदस्यपदाची संधी देण्यात आली.

शिवसेना-भाजप युतीच्या सूत्रानुसार स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे आहे. भाजपकडून गजानन बारवाल यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. स्थायी समितीच्या निवडीनंतर आज समितीचे मावळते सभापती मोहन मोगवले यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्प सभेला नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य ऋषिकेश खैरे आणि सिद्धांत शिरसाट यांनी दांडी मारली होती.